लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरभर डेंग्यूने घातलेला कहर आणि विरोधी पक्षांनी केलेली विशेष आमसभेची मागणी या पार्श्वभूमीवर महापौर संजय नरवणे यांनी सोमवारी साथीचे आजार व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. या बंदद्वार आढावा बैठकीत प्रशासनाने नेहमीप्रमाणे उपाययोजनांचा दावा केला; मात्र डेंग्यूवर विशेष आमसभा घ्यावी, या मागणीसाठी आग्रही असलेले विरोधी पक्षनेता व बसपचे गटनेता उपस्थित नसल्याने ही आढावा बैठक ‘अळणी’ ठरली. अ. नाजीम व दिनेश बूब वगळता सत्ताधीशांची संख्या अधिक असल्याने डेंग्यूवर आक्रमक अशी चर्चा झाली नाही. प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करीत गृहभेटी वाढविण्याचे निर्देश महापौरांनी दिलेत.डेंग्यूबाबत आ. सुनील देशमुख व पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी बैठकी घेतल्या. डेंग्यू नियंत्रणाचे आदेश दिलेत. पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर तर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर निलंबन व अन्य कारवाई करण्यात आली. त्यामुळे महापौरांच्या बैठकीत हशील काय, असा प्रतिप्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांनी बैठकीनंतर उपस्थित केला. विरोधी पक्षातील सदस्यांची अनुपस्थिती प्रशासनाच्या पथ्यावर पडली. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणी राबविण्याचे निर्देश देऊन ही साथरोग आढावा बैठक गुंडाळली.डेंग्यूवर विशेष आमसभा घेण्यात यावी, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, बसपचे गटनेता चेतन पवार आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी केली होती. ती फेटाळून १८ सप्टेंबरच्या आमसभेत डेंग्यूच्या प्रस्तावाला प्राधान्य देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले होते.
अपयश झाकण्यासाठी सभा स्थगित, विरोधकांचा आरोपस्टार रेटिंगच्या मुद्द्यावर सभा स्थगित करण्यात आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना डेंग्यूवर चर्चा करायची नव्हती; अपयश झाकण्यासाठी सभा स्थगित करण्यात आल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आला. त्यानंतर महापौर संजय नरवणे यांनी १८ सप्टेंबरला दुपारी आयुक्तांना पत्र देऊन २४ रोजी डेंग्यूबाबत आपल्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेता व विरोधी पक्षांची बैठक बोलवावी, असे बजावले. त्यानुसार, सोमवारी दुपारी १ च्या सुमारास आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात महापौरांनी साथरोगांचा आढावा घेतला.या बैठकीला महापौरांसह उपमहापौर संध्या टिकले, सभागृह नेता सुनील काळे, गटनेता दिनेश बूब, अ. नाजीम, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रकाश बन्सोड, उपायुक्त महेश देशमुख व नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी अजय जाधव आणि जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते. डेंग्यू रुग्ण आहेत, त्या परिसरात धूरळणी व फवारणीसह डास प्रतिबंधक औषध टाकण्याचे निर्देश महापौरांनी दिले. गृहभेटीदरम्यान नागरिकांना डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या लक्षणांची माहिती द्यावी, नागरिकांनी ०७२१-२५७६४८२, ८७८८३०८६४६ व ९८३४७७५३१३ या क्रमांकावर संपर्क करून त्यांच्या स्वच्छताविषयक तक्रारी नोंदवाव्यात तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन महापौरांनी केले.माजी उपमहापौरांचा सामाजिक पुढाकारडेंग्यूबळी : दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध फौजदारी तक्रारअमरावती : शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना दस्तुरनगर येथील रमेशलाल वर्मा यांचा डेंग्यूने झालेल्या मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत माजी उपमहापौर प्रमोद पांडे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पांडे यांनी १५ सप्टेंबर रोजी राजापेठ पोलिसांत याबाबत तक्रार नोंदविली. शहर स्वच्छ ठेवणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासह त्यांचे निर्मूलन, नाल्यांची स्वच्छता न झाल्याने शहरात डेंग्यूने मृत्यू होत असतील, तर त्यास महापालिका नव्हे, तर कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी तक्रारीतून उपस्थित केला. महापालिका प्रशासनाने शहरात डेंग्यू नसल्याचे व डेंग्यूने एकही मृत्यू न झाल्याचे जाहीर करावे; तसे नसल्यास वस्तुनिष्ठ व खºया माहितेसह अमरावतीकरांसमोर यावे, असे आव्हानच त्यांनी दिले.ही तक्रार राजापेठ पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली आहे.सततच्या बैठकांमधून काय साध्य झाले?बैठकीला प्रशासनाकडून सर्व गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले व बसपचे गटनेता चेतन पवार अनुपस्थित राहिले. बबलू शेखावत हे काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाल्याने येऊ शकले नाहीत. असे असले तरी याआधी पालकमंत्री व आ. सुनील देशमुख यांनी याच विषयावर बैठकी घेतल्याने आणखी बैठकांचे हशील काय , असा सवाल शेखावत व पवार यांनी उपस्थित केला आहे.स्थगित आमसभा घेण्याची मागणीमहापौरांनी बोलाविलेल्या बैठकीला न जाता बबलू शेखावत व चेतन पवार यांनी सोमवारी स्थगित आमसभा पुन्हा घेण्याची विनंती केली आहे. १८ सप्टेंबर रोजीची स्थगित झालेली सर्वसाधारण सभा पुन्हा घेण्यात यावी व त्यात विषयपत्रिकेवरील डेंग्यूसंदर्भातील विषय क्रमांक ६० प्राधान्याने घेण्यात यावा, अशी विनंती पवार आणि शेखावत यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली आहे.बडनेºयात डेंग्यूने एकाचा मृत्यूबडनेरा : नवीवस्ती परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहित युवकाचा २३ सप्टेंबरला उशिरा रात्री पीडीएमसीत डेंग्यूने मृत्यू झाला. शेख फारुख शेख छोटू (३३, मोबीनपुरा) असे डेंग्यूने मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. चार-पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने बडनेºयातील खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेले. तेथे रक्तनमुने तपासल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पीडीएमसीत पाठविले. आईवडिलांना तो एकुलता मुलगा होता. दरम्यान, बडनेऱ्यातील शेख फारुख शेख छोटू हा युवक २० सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याच्या रक्तनमुन्यात डेंग्यूची लक्षणे आढळली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी यांनी सांगितले.