लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) चे पथक दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यत नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ (एनसीएस) चे पथकही साद्राबाडीत पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली.मुंबई येथील जीएसआयच्या पथकात भूवैज्ञानिक मिलिंद धकाते, मुकेश शर्मा, भुपेश उरखडे, प्रसाद, संजय वानखडे यांचा समावेश आहे. या पथकाने भूकंपाने गावांतील घरांच्या भिंतींना पडलेल्या भेगांचे अवलोकन ेकेले. गावातील विहिरी, तलाव, पीएससी यांचीही पाहणी केली. साद्राबाडी येथे जाणवणारे धक्के व आवाज हे भूकंपाचे नसून, भूगर्भातील हालचाली व जमिनीखालील वाफेचे असल्याचे या पथकाने सांगितले. जमिनीत भेगा पडल्यामुळे भूगर्भात पाणी जाऊन हालचाली होत असल्याचे मत पथकाने व्यक्त केले. पथकाद्वारा गावात तीन ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार आहे व याचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती या पथकातील भूवैज्ञानिकांनी दिली.राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ या संस्थेच्या तज्ज्ञांचे पथकही दिल्लीहून शुक्रवारी सकाळी नागपूरला पोहोचले. सायंकाळपर्यंत साद्राबाडी येथे हे पथक दाखल होणार आहे. एनसीएसच्या पथकात तज्ज्ञ कुलबीर सिंह आणि बबन सिंह यांचा समावेश आहे. या दोन्ही पथकांच्या अहवालानुसार भूकंपसदृश घटनांचे शास्त्रीय कारण कळू शकणार आहे. शासनाच्या सर्व विभागांच्या समन्वयातून सुसज्ज यंत्रणा साद्राबाडी येथे पूर्णवेळ कार्यरत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.जीएसआय पथकाने अनुभवला धक्काशुक्रवारी दुपारी जीआयएस पथक साद्राबाडी गावात पाहणी करीत असताना २.२१ वाजता पथकातील भूवैज्ञानिकांनी भूकंपाचा धक्का व आवाजाचा थरार अनुभवला. गुरुवारी मध्यरात्री पाच वेळा धक्के जाणवले. आतापर्यत दीडशेवर धक्के बसल्याची माहिती गावकऱ्यांनी पथकाला दिली. धक्का जाणवाल्यावर विशिष्ट असा दर्प येतो. हा दर्प कशाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नसल्याचे गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अकोला येथील भूकंपमापक यंत्रावर नोंद नाहीसाद्राबाडी परिसरात जाणवणारे धक्के व आवाज हे भूंकपाचे आहेत की या भूस्तरातील हालचाली आहे, याची शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी करण्यासाठी दोन चमू बोलाविण्यात आल्यात. जीएसआयचे पथक भुस्तरातील हालचाल विषयीचे निरीक्षण नोंदविणार आहे, तर एनसीएसची चमू ही भूकंपविषयक निरीक्षण करणार आहे. सध्या होत असलेल्या आवाजाची व धक्क्याची तीव्रता तेवढी नाही. अकोला येथील भूकंपमापक यंत्रावर नांदेड येथील भूकंपविषयक हालचालींची नोंद झाली. मात्र, साद्राबाडी येथील नोंद झालेली नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या दोन्ही प्रकारच्या शक्यतांची पडताळणी करीत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
-तरीही भूकंपाच्या शक्यतांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 9:45 PM
धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) चे पथक दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यत नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ (एनसीएस) चे पथकही साद्राबाडीत पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ‘जीएसआय’पथक दाखल, ‘एनसीएस’ची टीम पोहोचली