अमरावती : जागतिक बँक व राज्य शासनाच्या सहकार्याने ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोखरा) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी गुरूवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये क्षेत्रिय स्तारवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तज्ञांद्वारा मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, घटक तसेच प्रकल्पांतर्गत राबवायच्या बाबीविषयी ‘पोखरा’चे कृषी व्यवसायतज्ञ रफीक नाईकवाडी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्माचे प्रकल्प संचालक मिसाळ, प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख ए.वाय. ठाकरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एम.जे. चिखले, मृद व रसायन शास्त्रज्ञ पी.डी. देशमुख, कृषी विज्ञान केंद्र घातखेड्याचे समन्वयक ए.पी. कळसस्कर, प्रादेशिक रेशिम विकास अधिकारी आर.एस. माने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र झा, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बोंडअळीवर कार्यशाळासदर कार्यशाळेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे वनस्पतीरोग शास्त्रज्ञ व्ही.व्ही. देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, विभागीय कृषी अधीक्षक, विजय चव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदींनी मार्गदर्शन केले. आत्माचे मिसाळ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जे. चिखले, मृद व रसायन शास्त्रज्ञ पी.डी. देशमुख, कृषी विज्ञान केंद्र घातखेड्याचे ए.पी.कळसकर यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेशक व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पोखरा’ प्रकल्पातील गावसमूहाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:00 PM
जागतिक बँक व राज्य शासनाच्या सहकार्याने ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोखरा) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी गुरूवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हास्तरीय कार्यशाळा : तज्ज्ञांचे मार्गदर्शन