तिवसा : तिवसा तहसीलवर लाल बाबटातर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. तिवसा शहरातील पाणी समस्या व घरकुल समस्यांचा मुद्दादेखील आंदोलनात गाजला. क्रांती दिनी देशभर जोरदार आंदोलन झाले. या आंदोलनाचा भाग म्हणून तिवसा शहरातील आंदोलन करण्यात आले.
शेतकरीविरोधी काळे तीन विधेयक मागे घ्या. आशा वर्कर, शालेय पोषण कामगारांना १८ हजार रुपये मानधन द्या. महागाई कमी करा. मोदी सरकार राजीनामा द्या आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार फरताडे यांना एका प्रतिनिधी मंडळाने सादर केले. अखिल भारतीय शेतमजूर युनियन लालबावटा, अखिल भारतीय किसान सभा व सिटू कामगार संघटना या तीन संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन, किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गारपवार यांनी केले. त्यांनी नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचेसुद्धा वाभाडे काढले. आंदोलनात सदाशिव विघ्ने, अंकुश वाघ, बेबी सुरजुसे, गुंफा गेडाम, सुरेश मोरघडे, माला जिरापुरे, अरुणा तागडे, धनराज चतुर्भुज, छाया होले, सुभाष खांडेकर, प्रफुल निकाळजे, रामगोपाल निमावत, प्रतिभा मकेश्वर, सिंधू राठोड आदी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘मोदी सरकार चले जाव’च्या घोषणेने आंदोलन संपविण्यात आले.