लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाक्यावर सोमवारी मध्यरात्री १२ वाजता एका चारचाकी वाहनातून एक रिव्हॉल्वर, डबल बॅरल गन व २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.विधानसभा निवडणुकीदरम्यान अमरावती ते इंदूर (मध्य प्रदेश) या आंतरराज्य महामार्गावर शहरातील चांदूरबाजार नाका येथे पोलिसांचा तपासणी नाका लावण्यात आला आहे. तेथे ही कारवाई करण्यात आली. चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले. संत्रा खरेदीसाठी दिल्लीहून अचलपूरला आल्याचा दावा त्या तिघांनी केला. नाका पथकप्रमुख पंकज बोनखडे यांनी एचआर ८५ टीएमपी/२०१९/१०८८६ या चारचाकी वाहनाची तपासणी केली. त्यात चालक व मालक विजेंद्र जयओम डागर (४०, रा. इसापूर, जि. नजफगढ, दिल्ली), संदीपकुमार लांबा व कुलदीप महेंद्रसिंग (सर्व रा. दिल्ली) असे तिघे बसून होते. सदर वाहनात ३२ बोरची काळ्या रंगाची एक रिव्हॉल्वर, सहा जिवंत काडतूस, तसेच २.१२ डबल बॅरल गन व २२ जिवंत काडतूस आढळून आले. त्यांच्याकडे दोन्ही अग्निशस्त्रांचे परवाने मिळून आले. मात्र, त्याचे नूतनीकरण केलेले नव्हते. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन बयान नोंदविण्यात आले. शस्त्र जप्त करण्यात आले.वाहनांची तपासणीविधानसभा निवडणुकीदरम्यान आंतरजिल्हा व आंतरराज्य महामार्गावर रात्रीच्या सुमारास प्रत्येक वाहनाची तपासणी होेत आहे. गत आठवड्यात अचलपुरातील एका मिरची व्यापाऱ्याची रक्कम पकडण्यात आली होती. त्यानंतर थेट संत्रा व्यापाऱ्यांजवळ परवाना नूतनीकरण न केलेले शस्त्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. जुळ्या शहरात अलीकडच्या घटनांमुळे प्रत्येक संशयित बाबीकडे पोलिसांचे लक्ष आहे.
रिव्हॉल्व्हर, बंदूक, २८ काडतूसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:50 AM
विधानसभा निवडणुकीदरम्यान अमरावती ते इंदूर (मध्य प्रदेश) या आंतरराज्य महामार्गावर शहरातील चांदूरबाजार नाका येथे पोलिसांचा तपासणी नाका लावण्यात आला आहे. तेथे ही कारवाई करण्यात आली. चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले. संत्रा खरेदीसाठी दिल्लीहून अचलपूरला आल्याचा दावा त्या तिघांनी केला.
ठळक मुद्देदिल्लीचे संत्रा व्यापारी शहरात : पोलिसांची कारवाई, तिघे ताब्यात