मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर येथील विकास तीन वर्षांपासून ठप्प झाल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी २१ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्या मध्यस्थीनंतर २३ जानेवारी रोजी हे उपोषण स्थगित करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य सुभाष वानखडे, गजानन पोहकार, गंगा वानखडे, लीला वानखडे, सुमित्रा वानखडे, प्रतिभा साबळे, संगीता वानखडे, अंजू मोहोड, राजेश डरगे, रजनी गवई, धृपदा बोबडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तात्या मेश्राम यांनी उपोषण सुरू केले होते.
२१ जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल, गटविकास अधिकारी प्रवीण हरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण सोळंके सरपंच गोपाळ जायठे, सचिन डावके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, साबीर अब्दुल अजीज यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढली.
---------------