- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. जिल्ह्यात यंदा २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. उशिरा व अनियमित पावसामुळे बहुतांश शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. हिमतीने पिके जोपासल्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या पाहणीत पिकांवर ९६ टक्क््यांपर्यंत बोंडअळी असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान शेतक-यांनी बोंडअळीसंदर्भात तक्रारी करण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांनी बीटी बियाण्यासंदर्भात दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, ५४५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात, तर वरूड तालुक्यात सर्वांत कमी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व भातकुली तालुक्यात बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात एकही तक्रार नाही. मात्र, चिखलदरा तालुक्यात ४३२ हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. बीटी कंपन्यांची तपासणी करागत दोन वर्षांच्या तुलनेत कपाशीचा पेरा यंदा जादा झाल्याने शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांनी विक्रीस काढले. बीटी बियाणे कंपन्यांच्या प्रयोगशाळांची तपासणी करावी. बियाणे विक्रीचा रेकार्ड तपासावा, रॉयल्टीविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उभ्या पिकात फिरविला नांगर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी उभ्या पिकात नांगर फिरविला. उत्पादन होणार नसेल तर काय उपयोग, असे म्हणत शेकडो शेतक-यांनी रबी पिकासाठी जमीन मोकळी केली. कपाशीची मोड करायच्या विचाराने दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर येथील भानुदास देशमुख या शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
बोंडअळी बाधित शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल, तर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सरसकट मदत जाहीर करावी. केवळ तक्रारी जमा करून काहीच होणार नाही. - जगदीशनाना बोंडे,शेतकरी नेते, अमरावती
तालुकानिहाय तक्रारी तालुका तक्रारी अचलपूर ३३अंजनगाव सुर्जी २६३भातकुली २९०चांदूर रेल्वे २५५चांदूर बाजार १४४धामणगाव रेल्वे २७२दर्यापूर १७३नांदगाव खंडेश्वर ५४५मोर्शी ४३तिवसा १८वरूड ०२