तिवसा : कोरोनाचे काळात वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनता सोसत असताना बांधकामासाठी आवश्यक असणारे रेती, विटा, लोहा सिमेंट यांचे भाव गगनाला भिडले आहे. घराचे बांधकाम करणे जवळजवळ बंद अवस्थेत असल्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या बांधकाम गवंडी, मिस्त्री, सेंट्रींग व्यावसायी, कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणारे लोखंड ६ हजार रुपये क्विंटल, सिमेंट ४०० रुपये बॅग, विटा ११ हजार रुपये, रेती ६ हजार रुपये ट्रॅक्टर, गिट्टी व इतर लागणाऱ्या वस्तू महागल्यामुळे बांधकाम जवळजवळ बंद झाले आहे. पयार्याने यावर अवलंबून असणारे कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच लॉकडाऊनचा मोठा फटका कामगारांना बसला आहे.