अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा (बंदी) : यंदा ३३ कोटी वृक्ष अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षीच्या वन महोत्सवात केली होती. त्यांची ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी वर्षभर कष्ट घेत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळातील शिवारात रोपवाटिका तयार केली. दोन हेक्टर परिसरात असलेल्या या रोपवाटिकेत आज विविध प्रजातींची तब्बल दोन लाख रोपटी डौलात उभी आहेत. या रोपवाटीकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये बीज प्रक्रियेची तयारी सुरू झाली.पोहरा वनवर्तुळातील रोपवाटिकेचे नियोजनही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले आहे. रोपट्यांच्या योग्य संगोपनासोबतच पाणी, खत, फवारणी याचाही योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांमध्ये माती, शेणखत व रेतीचे योग्य मिश्रणात ही रोपटी जगविण्यात आली. यातील सर्व रोपटी निरोगी आहेत. सध्या या रोपवाटिकेत विविध प्रजातींची दर्जेदार रोपटी पाहावयास मिळतात. त्यामुळे ही रोपटी ९ ते १७ महिन्यांची असून, यातील १ लाख रोपटी लागवडीसाठी तयार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. सोबतच नऊ महिन्यांच्या आतील दोन लाख रोपटी पुढील वन महोत्सवादरम्यान लागवडीसाठी तयार राहण्याचा विश्वास वनाधिकाºयांनी व्यक्त केला. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, क्षेत्र सहायक विनोद कोहळे, वनरक्षक डी.ओ. चव्हाण, रोजगार सेवक अकील सैयद आदींनी या रोपवाटीकेसाठी परिश्रम घेतले.वाटिकेत ३३ प्रजातींची रोपटी उपलब्धया रोपवाटिकेत २३ प्रजातींची रोपटी आहेत. करंज, पापडा, सिसम, आवळा, मायरूक, चिंच, इंग्लिश चिंच, गोरक चिंच, सिरस, बिहाळा, जांभूळ, अमलतास, बेल, कवट, खैयर, कांचन, रक्तचंदन, निंब, पिंपळ, बांबू, सितप्रतिम या प्रजातीचे छोटेमोठे रोपटे उपलब्ध असून, ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जय्यत तयारी सुरू आहे.
पोहऱ्यात बहरली रोपवााटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:26 PM
यंदा ३३ कोटी वृक्ष अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षीच्या वन महोत्सवात केली होती. त्यांची ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी वर्षभर कष्ट घेत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळातील शिवारात रोपवाटिका तयार केली.
ठळक मुद्देदोन हेक्टर व्याप : लाखो रोपटी उपलब्ध