सर्पमित्रांचे सर्वेक्षण : वर्षभराची आकडेवारी, वडाळी मार्गावर सर्वाधिक घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅगस्ट २०१६ ते १० जुलै २०१७ या कालावधीत सर्पमित्रांनी केलेल्या सर्वेक्षणात रस्ता अपघातात वाहनांखाली चिरडून जिल्ह्यातील ६६४ सापांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भातील सापांच्या मृत्यूच्या नोंदी घेऊन ते वसा ग्रुपच्या माध्यमातून ब्रेक फॉर स्नेक या प्रकल्पाला देण्यात आला आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने प्रत्येक सजीवाला त्यांच्या राहणीमानात करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वातावरणात अतुलनीय बदल घडून येतात. यातून भूगर्भाच्या आंतरिक तापमानातून वाढ झाल्याने बिळात राहणारे प्राणी कोरड्या वातारणाच्या शोधात बाहेर पडतात. अशातच साप व इतर सरपटणाऱ्या प्राणी डांबरी रस्त्याचावर येऊन चिरडल्या जातात, असे मत सर्पमित्र भूषण सायंके यांनी व्यक्त केले. बडनेरा - यवतमाळ मार्गावर ४६ सापांचा अपघातात मृत्यू झाला आहे. वडाळी - चांदूररेल्वे मार्गावर २२८ साप मृत्यूमुखी पडलेत. दस्तुरनगर चौक ते उतखेड मार्गावर १८७, विद्यापीठ ते केकतपूर रस्त्यावर ३८,पंचवटीचौक ते नांदगाव मार्गावर ५६, काठोरा नाका ते वलगाव १०९, आदी ठिकाणी रस्ता अपघातात सांपाचा बळी गेला आहे. सदर सर्वेक्षण हे सर्पमित्र अभिदानी, अक्षय चांबटकर, शुभम सायंके, गणेश अकर्ते,रत्नदीप वानखडे, मुकेल वाघमारे, प्रतिक तिवारी, धिरज शिंदे, ऋषिकेश देशमुख, सायलस शिंदे, सुरज लव्हाळे, जय सोहणे, अनिकेत देशमुख आदींनी केले आहे.
रस्ता अपघातात ६६४ सापांचा चिरडून मृत्यू
By admin | Published: July 17, 2017 12:14 AM