शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

अतिक्रमणाने गिळले अचलपूरचे रस्ते

By admin | Published: July 14, 2017 12:41 AM

जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते,

वाहतूक बेशिस्त : जनता त्रस्त, अपघाताचा धोका कायम, वाहतुकीला अडथळासुनील देशपांडे। लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते, त्यात बेशिस्त वाहतुकीचा कहर यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची रूंदी तेवढीच आहे. बाजारपेठ अधिक गजबजत चालली आहे. याआधीच अरूंद रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी व हातगाड्याधारकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अधिकच अरूंद झाले आहेत. मात्र, हे अतिक्रमण हटविण्यात प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. शालेय साहित्य खरेदीची लगबगही सुरू आहे. त्यामुळे वर्दळ वाढली असून अतिक्रमण अधिकच डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यावर लागत असलेल्या हातगाड्यांमुळे वाहनांना अडसर निर्माण होत आहे. दुकानदारांनी रस्त्यावर माल रचून ठेवल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. वाहनधारकही बेशिस्त झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करून वाहने दामटली जात आहेत. रस्त्यांवर किरकोळ अपघात एक दिवसाआड घडतात. येथील वाहतूक शाखेत कार्यरत सात कर्मचारी काही दिवसांपूर्वी परतवाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याने अचलपूर शहरासाठी वाहतूक पोलीस नाहीत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावणार कोण, हा प्रश्नच आहे. परतवाडा बसस्थानक वगळता कोठेही वाहतूक पोलीस नजरेस पडत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. आॅटोचालकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. तब्बल १ हजार अतिक्रमणधारकांची नावे यादीत आहेत. एसडीओ, पोलीस व महसूलचा समन्वय झाल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल. - सुनीता फिस्के, नगराध्यक्ष