राज्यमंत्री बच्चू कडूंनी केली पाहणी, कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
टाकरखेडा संभू : चांदूर बाजार तालुक्यातील रसुल्लापूर ते धानोरा या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या रस्त्याची पाहणी केली. अनेक त्रुटी आढळून आल्याने संबधित कंत्राटदारासह अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तालुक्यातील रसुल्लापूर ते धानोरा या रस्त्याकरिता एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. या एक किमी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावकऱ्यांनी केला होता. यामध्ये काळी माती मिश्रीत गिट्टी व मुरूम वापरणे, आवश्यकतेनुसार पाणी व व्हायब्रेटर रोलर व्यवस्थित न मारणे, सात मीटरऐवजी रस्त्याची रुंदी सहा मीटर केल्याचे आक्षेप बांधकाम विभागाकडे नोंदविण्यात आले. मात्र, अद्याप कारवाई झाली नाही. गावकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याची दखल घेत रस्त्याची पाहणी केली. रस्ता पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी रेटून धरली.
--