फोटो - दर्यापूर १३ पी
दर्यापूर : शहरात हायब्रिड ॲन्युईटी तत्त्वावर काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणचे ब्लॉक काढून पुन्हा रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. परिणामी दर्यापुरात वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील रेल्वे फाटक ते अकोट मार्गावरील कामे करण्यात येत असल्याने पुन्हा वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशावेळी वाहतूक पोलीस कुठेही दृष्टीस पडत नाही. काँक्रीटीकरणाच्या रस्त्याची कामे बांधकाम विभागाने आधी चांगली केली असती, तर पुन्हा रस्ता खोदून कामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या घराघरात गणरायांचे आगमन झाले आहे. सार्वजनिक मंडळांनीसुद्धा गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे. अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने तेथील वाहतूक दर्यापूर मार्गे वळली आहे. त्यामुळे दर्यापूर शहरातील वाहतूक वाढली आहे. असे असताना पुन्हा कामे करण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूककोंडी फोडावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
130921\1247-img-20210913-wa0005.jpg
दर्यापुरात रस्त्यांची कामे अन वाहतूक कोंडी....