शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रस्ते अन् अधिकारी दोन्ही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:03 PM

मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : विकासकामांचे वाजताहेत तीनतेरा, मेळघाटातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत. यामागील मुख्य कारण अभियंते व अधिकारी मुख्यालयी न राहता मोठ्या शहरातून मेळघाटचा कारभार पाहत आहेत.उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता सहायक यांची पदे येथे तयार करण्यात आली. त्यांचे कार्यालयही निर्माण करण्यात आले. मात्र, या कार्यालयात दोन-तीन कर्मचारी वगळता बहुतांश अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र नित्त्याचेच झाले आहे.जिल्हा परिषदेतर्फे मेळघाटातील अतिदुर्गम भागातील गावखेड्यांचे धारणी मुख्यालयाशी संपर्क व्हावे, यासाठी रस्ते, रपटे व पुलांची जाळे कुपोषणाच्या उद्रेकानंतर १९९५ च्या काळात शासनाने विणले होते. मात्र या रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल जि.प. बांधकाम विभागाने न करता पुढे पाठ व मागे सपाट असे केल्याने जुने रस्ते बेपत्ता होत चालले आहेत. जुन्या रस्त्यावरील डाबंर दिसेनासे झाले आहे.जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील अभियंते मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे येथील विकासकामे कंत्राटदारांच्या मर्जीने होत असून कामाचा बाजेवारा उडत आहे. अवघ्या महिनाभरात डांबरीकरणाचे काम उखडणे, खडीकरणातील मुरुमाचे प्रमाण असल्याने गिट्टी बाहेर येणे, तर रपट्यांची निकृष्ट कामे अभियंत्यांच्या गैरहजेरीत होत असल्याने येथील विकासकामांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते.अधिकाºयांच्या हजेरीचा दिवस शुक्रवारया विभागातील निवडक कर्मचारी वगळता अभियंता वर्ग नेहमीच अमरावती-परतवाडा येथील आपल्या निवासातून काम करीत आहे. केवळ देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी शुक्रवारी एकच दिवस येत असल्याचे या कार्यालयात कामानिमित्त जाणाºया अनेकांनी सांगितले. अशा अभियंत्यांच्या मस्टरची पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी जोर धरीत आहे.