यार्ड फुल्ल : तूर मोजणीच्या प्रतीक्षेतधामणगाव (रेल्वे) : येथील बाजार समितीत एकाच दिवशी २५ हजार क्विंटल तुरीची विक्रमी आवक झाली असून दोन कीलोमीटरपर्यंत वाहनांची लांब रीघ पहायला मिळत आहे़ दरम्यान २५ हजार बारदाने प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी सभापती मोहन इंगळे यांनी केली़धामणगाव बाजार समितीत एफसीआयच्यावतीने तूर खरेदी सुरू आहे़ १५ एप्रिलपर्यंत एफसीआयने ३० हजार क्विंटलची खरेदी केली आहे़ साडेसात हजार बारदाने उपलब्ध झाल्याने एफसीआयने बुधवारपासून तूर खरेदीला सुरूवात केली़ बाजार समिती प्रशासनाने गुरूवारी सायंकाळ पर्यंत तुरीची आवक घेतली जाईल, असे जाहीर केल्याने बाजार समितीच्या बाहेर तूर घेऊन आलेल्या वाहनांची पहाटे लांब रीघ लागली होती़दरम्यान सर्व वाहनधारकांना टोकन देण्यात आले असून दुपारपर्यंत २५ हजार क्विंटल तुरीची नोंदणी टोकन पद्धतीत झाली होती़ शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, पारदर्शकपणे तूरीची खरेदी व्हावी म्हणून बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, तहसीलदार सी़सी़ कोहरे, दुय्यम निंबधक अधीकारी राऊत, एफसीआय चे अधीकारी कौशीक सोनवाणे तसेच संचालक मंडळ तूरीची आवक व खरेदी प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहे़ २२ एप्रिल पर्यंत तूर खरेदीचे आदेश शासनाने दिल्यामुळे येथील बाजार समितीत तूरीची विक्रमी आवक वाढली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
धामणगावात तुरीची विक्रमी आवक
By admin | Published: April 21, 2017 12:18 AM