शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

रूपाला मिळाले पहिले वेतन, शंकरबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू, १०० टक्के पोलिओग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 8:08 AM

अचलपूर नगर परिषदेने विकलांग पुनर्वसनात पुढाकार घेत तिला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली आहे. 

परतवाडा (जि. अमरावती) : २५ वर्षांआधी पंढरपूर येथील विठोबाच्या पायथ्याशी सापडलेल्या रूपाने पहिला पगार अनाथांचे नाथ शंकरबाबांच्या हाती ठेवताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कारण १०० टक्के पोलिओग्रस्त आणि कमरेपासून दोन्ही पायांनी निकामी असलेल्या या मुलीची काळजी आता मिटली आहे. अचलपूर नगर परिषदेने विकलांग पुनर्वसनात पुढाकार घेत तिला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली आहे. 

शारीरिक व्यंगामुळे रूपाला तिच्या आई-वडिलांनी पंढरपूर येथे सोडून दिले होते. पोलिसांनी तिचे पालक न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशावरून परतवाडा येथून आठ किमी अंतरावरील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात आजीवन पुनर्वसनाकरिता दिले. शंकरबाबांनी तिला बारावीपर्यंत शिक्षण दिले. बालगृहातील मंजुळा नामक मुलगी ही स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची ने-आण तसेच संपूर्ण विधी व सांभाळ करते. तिच्या शिक्षणाचा खर्च पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केला होता. तिचे आधार कार्डदेखील तयार झाले आहे. 

पगार ठेवला बाबांच्या हातीशुक्रवारी दुपारी ४ वाजता नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्या पगाराच्या रूपाने सहा हजार रुपये तिच्या हाती ठेवले. तो पगार शंकरबाबांच्या हाती तिने ठेवताच त्यांच्या डोळ्यांत परिश्रमाचे चीज झाल्याचे भाव आणि आनंदाश्रू होते. बाबांनी ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना ही आनंद घटना सांगितली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अचलपूर नगर परिषदेबाबत गौरवोद्गार काढले.

जिल्हाधिकारी कौर यांना केली विनंतीरूपाचे बारावीनंतर काय, याची चिंता बाबांना लागली होती. तिला नियमानुसार सज्ञान झाल्यानंतर बालगृहाबाहेर काढणे जरूरी होते. योगायोगाने जिल्हाधिकारी  पवनीत कौर संस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या तेव्हा माझ्या रूपाला कोणतीही नोकरी देऊन जीवनदान द्या, अशी विनवणी शंकरबाबांनी त्यांना केली. त्यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना बोलावून  अचलपूर नगर परिषदेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोकरीचे निर्देश दिले. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी त्यावर अंमल केला आणि आरोग्य विभागात १४ सप्टेंबरपासून काम दिले. रूपा सकाळी १०.३० ते ५ पावेतो नगर परिषदेत नोकरी करते.

टॅग्स :Amravatiअमरावती