परतवाडा : उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर शहरातून गुरुवारी रूट मार्च काढण्यात आला.
अचलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना कायदा व सुव्यस्थेच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्यात. रूट मार्च अचलपूर शहरातील अतिसंवदेनशील चौकात व मोहल्ल्यातून नेण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या व अतिसंवेदनशील चौकांमध्ये फिक्स पॉईट, ड्युुटी, अंमलदार तैनात करण्यात आले . रूट मार्च करीता पोलीस स्टेशन अचलपूर येथील ठाणेदारयांच्या सह ४ अधिकारी व २८ अंमलदार, पो. स्टे. परतवाडा येथील १ अधिकारी व १० अंमलदार, पो.स्टे. सरमसपूरा येथील १ अधिकारी व ४ अंमलदार व आर.सी.पी. प्लाटूनमधील २५ अंमलदार व सैनिक ३६ सैनिक उपस्थित होते.
अचलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना कायदा व सुव्यस्थेच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्यात. रूट मार्च अचलपूर शहरातील अतिसंवदेनशील चौकात व मोहल्ल्यातून नेण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या व अतिसंवेदनशील चौकांमध्ये फिक्स पॉईट, ड्युुटी अंमलदार तैनात करण्यात आले . रूट मार्चकरिता अचलपूरचे ठाणेदारांसह चार अधिकारी व २८ अंमलदार, परतवाडा पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व १० अंमलदार, सरमसपुरा पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व चार अंमलदार आणि आर.सी.पी. प्लाटूनमधील २५ अंमलदार व ३६ सैनिक उपस्थित होते.