ओळख पटली : १९ मार्चपासून होता बेपत्ता
वनोजा बाग : तालुक्यातील खिराळा शिवारात ३ एप्रिल रोजी एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. दिपक किसनराव बुकेकार (३१, रा. खिराळा) अशी मृताची ओळख पटविण्यात आली.
खिराळा येथील किरण गिºहे यांच्या शेतात काम करत असलेल्या मजुरांना शेतात दुर्गंध येत असल्याने त्यांनी शोध घेतला असता शेतातील निंबाच्या झाडावर फाशी घेतलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. याबाबत पोलिस पाटील वैभव अढाऊ यांना माहिती देण्यात आली. दरम्यान त्यांनी १९ मार्च रोजी खिराळा येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या भावाला बोलावले. कपडे व व पायाला असलेल्या सहा बोटावरून तो मृतदेह दिपक किसनराव बुकेकार याचा असल्याची ओळख पटविण्यात आली. दिपक हा १९ मार्च रोजी रात्री दोन तीन वाजताच्या दरम्यान घरातून निघुन गेल्याची तक्रार त्याच्या पत्नीने अंजनगांव पोलिस ठाण्यात दिली होती त्यादिवशीपासून त्याचा शोध घेणे सुरू होते. दिपक हा गावात सलुनचा व्यवसाय करत असुन त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी आहे.
-------