ओळख पटली : १९ मार्चपासून होता बेपत्ता
वनोजा बाग : तालुक्यातील खिराळा शिवारात ३ एप्रिल रोजी कुजलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला. दतपक किसनराव बुकेकार (३१, रा. खिराळा) अशी मृताची ओळख पटविण्यात आली.
खिराळा येथील किरण गिऱ्हे यांच्या शेतात काम करीत असलेल्या मजुरांना शेतात दुर्गंध येत होता. त्यांनी शोध घेतला असता, शेतातील निंबाच्या झाडावर फाशी घेतलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. याबाबत पोलीस पाटील वैभव अढाऊ यांना माहिती देण्यात आली. त्यांनी १९ मार्च रोजी खिराळा येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या भावाला बोलावले. कपडे व व पायाला असलेल्या सहा बोटावरून तो मृतदेह दीपक किसनराव बुकेकार याचा असल्याची ओळख पटविण्यात आली. दीपक हा १९ मार्च रोजी रात्री दोननंतर घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या पत्नीने अंजनगांव पोलीस ठाण्यात दिली होती. त्या दिवशीपासून त्याचा शोध घेणे सुरू होते. दीपक हा गावात सलूनचा व्यवसाय करीत असून, त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी आहे.
-------