मागणी : रस्ता, जमीन समसमान करावालोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरचा रस्ता वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. रस्ता व जमीन लेव्हलमध्ये अर्ध्या फुटाचे अंतर असल्याने वाहनचालक पडत आहे. रात्रीच्या वेळेस येथून जीव मुठीत ठेवूनच चालावे लागत असल्याची स्थिती आहे. महामार्गावरील तसेच बडनेऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. आधीच हा पूल अरूंद आहे. रस्ता व जमीन लेव्हलमध्ये अंतर असल्यामुळे बरेच वाहनचालक येथे घसरून पडत आहे. या उड्डाणपुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे दुचाकीस्वार तसेच सायकलस्वारांना रात्रीच्या वेळी येथून जीव मुठीत ठेवून चालावे लागते आहे. या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. बऱ्याच वाहन चालकांना गंभीर इजादेखील झालेल्या आहेत. रस्त्याच्या एका बाजूने बरीच गॅप आहे. संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी बडनेरावासीयांसह वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून हा रस्ता समसमान केल्यास वाहनचालकांसाठी सोयीचे ठरेल, अशी मागणी होत आहे.पुलावरील रस्त्याच्या टाईल्स फुटल्यातमहामार्गावरच्या रेल्वे उड्डाणपुलावरील पादचाऱ्यांसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्याच्या स्टाईल्स फुटल्यामुळे पादचारी तसेच सायकलस्वारांना धोकादायक ठरत आहे. रात्री फुटलेल्या टाईल्स लक्षात येत नसल्याने बरेच सायकलस्वार याठिकाणी घसरून पडत आहे. फुटलेल्या टाईल्स हटवून तेथे नव्याने टाईल्स बसविण्यात याव्या ज्यामुळे येथून जाणाऱ्यांना त्यांचा धोका होणार नाही.
रेल्वे उड्डाणपूल मार्ग धोक्याचा
By admin | Published: July 12, 2017 12:13 AM