अचलपूर तालुक्यात नगरपालिका क्षेत्रात संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे एकूण ९ हजार ४२३ लाभार्थी आहे. त्यांना १ कोटी ९४ लाख ४१ हजार ४०० रुपयाचे दोन महिन्याचे कोरोनामुळे वेतन अदा करण्यात आले. अचलपूर तालुक्यात पंचायत समिती क्षेत्रात ग्रामीण लाभार्थ्यांची संख्या १५ हजार ५८८ असून यात संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा समावेश आहे.
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात ३ कोटी १४ लाख ४५ हजार चारशे रुपयाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. कोरोना काळात अचलपूर तालुक्यातील २५ हजार निराधारांच्या खात्यात पाच कोटी रक्कम थेट बँक खात्यात टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येकी दोन हजार एक रुपये प्रत्येक निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याने या रकमेतून त्यांची औषधे दवाखाना, किराणा आदी आवश्यक कामे होणार आहे. अचलपूर तालुक्याचे तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभारी तहसीलदार शंकर श्रीराव तसेच संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार एम. बी.सोळंके, अव्वल कारकून प्रदीप घुले, युनूस खान पठाण खा, व्ही. एच. कोठार, दाभाडे, विजया तायडे यांनी तातडीने पैसे वळते केले.
कोट
अचलपूर तालुक्यातील सर्व पात्र निराधार लाभार्थ्यांचे दोन महिन्यांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहे.
- एम. बी. सोळंके, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना