लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची प्रक्रिया मंगळवार, ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेनंतर सुरू करण्यात येणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी साईट सुरू झाली नव्हती. तसेच त्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या सूचना वेबसाईटवर दिसत नव्हत्या. त्यामुळे आरटीई प्रवेश अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या पालकांचा हिरमोड झाला.मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१) सी नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र यंदा सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला अनेक विघ्ने निर्माण झालीत. यासाठी मागील यावर्षी जिल्ह्यातील २३० शाळांची यादी शिक्षण विभागाकडे तयार केली होती. तसेच यंदा त्यात ९ शाळांची भर पडली आहे. त्यामुळे यंदा २३९ शाळांचा यात समावेश आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी शासनाने आरटी प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे.या पालकांनी मोबाईलवर डाऊनलोड करून घरबसल्या प्रवेश अर्ज करता येणार आहे. यामुळे घरापासून कोणती शाळा जवळ आहे. योग्य त्या कळणार आहे. त्यासाठी ५ मार्चपासून पालकांनी दुपारी चार वाजेपासून लॉगीन सुरू करण्यात येणार होते. त्यानंतर पालकांना अर्ज भरून माहिती सबमिट करता येणार होती. परंतु शाळांचीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मंगळवार, ५ मार्च रोजी ही वेबसाईट सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे याबाबत वेबसाईटवर पालकांसाठी कुठलीही सूचना दिसत नव्हती. त्यामुळे ही प्रकिया दिलेल्या तारखेप्रमाणे सुरू झाली नाही.त्यामुळे पालकांना ७ मार्चच्या रात्रीपासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.पहिली सोडत १४ मार्चलाशिक्षण विभागाने यापूर्वी पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरणाऱ्यांची प्रवेशाची पहिली लॉटरी १४ मार्च रोजी काढली जाईल, असे सांगितले होते. मात्र या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया लांबली आहे. मागील वर्षी १३ मार्च २०१८ रोजी पहिली सोडत काढून प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरुवात झाली होती.शेवटच्या शाळेचे लॉगिन ६ मार्च रोजी सायंकाळपर्यंत झालेले नव्हते. त्यामुळे ५ मार्चपासून प्रवेश अर्ज भरता आले नाहीत. मात्र आता पालकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.- आर. डी तुरणकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
आरटीईला पहिल्याच दिवशी विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 10:21 PM
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची प्रक्रिया मंगळवार, ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेनंतर सुरू करण्यात येणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी साईट सुरू झाली नव्हती. तसेच त्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या सूचना वेबसाईटवर दिसत नव्हत्या. त्यामुळे आरटीई प्रवेश अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या पालकांचा हिरमोड झाला.
ठळक मुद्दे२५ टक्के प्रवेशाचा तिढा : तांत्रिक कारणाने वेबसाईट गायब