अमरावती : राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २१ डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १ हजार ८०० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यानुसार सोमवार हा प्रवेशासाठी शेवटचा दिवस असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ही मुदत आता संपली आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठी १७ मार्च रोजी पहिली लॉटरी काढण्यात आली. अशा मुलांचे २७ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यानंतर ३० सप्टेंबर ते डिसेंबर म्हणजे जवळपास साडेतीन ते चार महिने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.
कोट
आरटीई प्रवेशाकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. ही मुदत आता संपली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मुदतवाढीमुळे मिळाली होती.
ई.झेड खान
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)