उपयोग काय? : पालकांना दिल्या सूचनाअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया यशस्वी झालेली नसताना उशिरा जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने आरटीईची दुसऱ्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत काही तांत्रिक चुका असताना त्यामधील त्रुटी दूर करून पालकांना एसएमएसद्वारे प्रवेश घेण्याच्या सूचित केले जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीने आरटीईनुसार प्रवेश प्रक्रियेला खेळ मांडल्याचे चित्र आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरटीईनुसार शिक्षणाचा लाभ व्हावा, या हेतूने २५ टक्के पाल्यांना अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देणे बंधनकारक केले. त्यानुसार शिक्षण विभागाने मागील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर सोडतीद्वारे पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळाही निर्धारित केल्यात. मात्र, शाळांनी नर्सरी व पहिली प्रवेशाचा गोंधळ घालत आरटीईनुसार प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे काही ठिकाणी प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत. काही शाळांनी तर आरटीईनुसार प्रवेशच दिलेले नाहीत. त्यासंदर्भात शिक्षण समितीकडून अहवालही मागविण्यात आलेत. ते अहवाल शिक्षण विभागाकडून उपसंचालकांना देण्यात आले. यामध्ये चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्रही आटोपले. सहामाही परीक्षा सुरू असताना शिक्षण मंडळाने आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर याचा फायदा काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आरटीई प्रवेशाचा खेळ पुन्हा सुरू
By admin | Published: November 05, 2015 12:22 AM