अमरावती - अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे.आरटीओ कार्यालयाच्यावतीने वर्षभरात चारचाकी वाहनचालकांकडे आॅटो पोल्युशन कंट्रोल पावती, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक, वाहन परवाना, चालक परवाना, फिटनेस प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अनेक वाहनचालकांकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत. परिणामी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल ते सप्टेंबर २०१७ ला कालखंडात आरटीओच्यावतीने ५०२ वाहने तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहनचालकांकडे पीयूसी, वाहन फिटनेस प्रमाणपत्र, अवजड वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १४ जणांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांकडून तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. न्यायालयीन दंडासह आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहे. तसेच चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषत: क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक, प्रदूषणयुक्त वाहतूक करणारे, चालक वाहन परवाना नसणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया एकूण २१६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६२ वाहनांवर तडजोडीतून ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये वसूल करण्यात आले आहे. तसेच १४ वाहनचालकांवर न्यायालयीन खटले सुरू आहेत. पीयूसीशिवाय वाहन चालवून पर्यावरणात प्रदूषणाची वाढ करणाºया वाहनचालकांविरुद्ध आरटीओने कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. आरटीओ कार्यालयाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक आणि नियमबाह्य वाहतूक करणाºयाविरोधात कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. नियमित वाहन तपासणीत ५०२ वाहनांकडून २ कोटी, २२ लाख २०० रुपये वसूल करण्यात आलेत. अवजड वाहतूकप्रकरणी २१६ वाहने तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६२ वाहनचालकांविरुद्ध तडजोड शुल्क असे ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडासह न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी तयारी आरटीओ कार्यालयाने चालविली आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना कागदपत्रे जवळ बाळगणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. यापुढे बेकायदेशीर वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा वेग वाढविला जाईल.- विजय काठोडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती
आरटीओच्या खात्यात ३९ कोटी ७६ लाखांचे महसूल, अवजड वाहने लक्ष्य, बेकायदेशीर वाहतूक रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 4:35 PM