फोटो - ०२एएमपीएच०३, ०२एएमपीएच०४
अमरावती : रस्त्यावरील वाहनांचा वेग पूर्वी पोलीस विभाग स्पीड गन वाहनातून मोजून कारवाई करीत होता. मात्र, आता पोलिसांप्रमाणे आरटीओलासुद्धा विभागात सहा अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ मिळाले आहेत. त्यापैकी दोन वाहने अमरावतीला मिळाली असून, आरटीओ रामभाऊ गिते यांच्या हस्ते गुरुवारी या वाहनांचे पूजन करून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.
अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आरटीओला प्रत्येकी एक इंटरसेप्टर व्हेईकल, तर अमरावतीला दोन वाहने प्राप्त झाली आहेत. ही वाहने आता जिल्हाभर फिरून राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख व राज्य महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव वाहनांची गती व क्रमांक टिपतील. त्यानुसार त्यांच्यावर ऑनलाईन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, एआरटीओ प्रशांत देशमुख, मोटार वाहन निरीक्षक वैभव गुल्हाने, गणेश ओरोटे, गोरख शेलार यांच्यासह इतर मोटार वाहन निरीक्षकांची उपस्थिती होती.