अमरावती : नवीन वाहनांची नोंदणी, त्यापोटी मिळणार कर व विविध शीर्षाखाली मिळणारा कर याद्वारे यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये विभागात आरटीओला तब्बल ९४१५.२४ लाखांचा महसूल मिळाला आहे. उद्दिष्ट ६५ टक्के असताना कोरोनामुळे फक्त २२ टक्के महसूल गोळा झाला. सततचे लॉकडाऊन व कोरोनामुळे महसुलाला यंदा फटका बसला. तरीही नवीन वाहनांची नोंदणी यंदा जोरात होती, असे आरटीओने सांगितले.
सन २०२१-२२ मध्ये वार्षिक ४३४.७७ कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी जुलै २०२१ पर्यंत १४४.९२ कोटींचे उद्दिष्ट असताना ९४ कोटी १५ लाख २४ हजारांचा महसूल आरटीओला मिळाला. अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम या पाच जिल्ह्यात गतवर्षी सन २०२०-२१ मध्ये आरटीओला वार्षिक ३९४.७४ कोटींचे उद्दिष्ट होेते. जुलैपर्यंत चार महिन्याचे १३१.५८ कोटींचे उद्दिष्ट होेते. त्यापैकी ४० कोटी ६३ लाख ७२ हजारांचा महसूल आरटीओला मिळाला. कोरोनाकाळात आरटीओचे कामकाज थांबले होते. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे महसुलात घट झाली होती. मात्र, यंदा सर्वाधिक नवीन वाहन खरेदी झाली. त्यातून आरटीओला अपेक्षित महसूल मिळाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी सांगितले.
२०२१-२२ चार महिन्याचे आकडे (लाखांत)
जिल्हा उद्दिष्ट प्राप्त
अमरावती ४४६७ २६६३.४२
बुलडाणा २६९८ १७५२.८३
यवतमाळ ३५९५ २३९२.३४
अकोला २३७२ १७२०.१७
वाशिम १३६० ८८६.४८
एकूण १४४९२ ९४१५.२४
कोट
यंदा कोरोनामुळे व सततच्या लॉकडाऊनमुळे आरटीओला महसूल कमी मिळाला. मात्र, अनलॉकमध्ये नवीन वाहने खरेदी नोंदणी झाल्याने अपेक्षित महसूल वाढला.
रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती