शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

सुमधूर गीतांनी धुंद झाले रसिक

By admin | Published: September 13, 2015 12:02 AM

‘रिमझिम गिरे सावन...सुलग-सुलग जाए मन’ धनश्री देशपांडे हिच्या सुमधुर आवाजातील गीताने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला.

‘दिल ने फिर याद किया’ कार्यक्रम : ‘लोकमत’, सिम्फनी ग्रुपचा उपक्रमअमरावती : ‘रिमझिम गिरे सावन...सुलग-सुलग जाए मन’ धनश्री देशपांडे हिच्या सुमधुर आवाजातील गीताने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर पार्श्वगायक गुणवंत डहाणे यांनी सादर केलेल्या ‘दिल ढुंढता है..फिर वही’ या गीतावर श्रोत्यांच्या टाळ्या पडल्या. अख्खे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह टाळ्यांच्या गजराने निनादून गेले होते. ‘दिल ने फिर याद किया’ हा कार्यक्रम अशा एकापेक्षा एक सरस गीतांमुळे अविस्मरणीय ठरला. ‘लोकमत’ सखी मंच व सिंफनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरातील नामवंत गायक कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘गौरव महाराष्ट्रा’चा फेम धनश्री देशपांडे ही कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होती. त्यानंतर पार्श्वगायक गुणवंत डहाणे, गायक संतोष बाहे, सीमा चक्रवर्ती यांनी कसदार आवाजात लता मंगेशकर, आशा भोसले, मो. रफी, मुकेश यांच्या गाण्यांची एकापेक्षा एक मेजवानीच सादर केली. सचिन गुढे व त्यांच्या सिम्फनी ग्रुपच्या वाद्यवृंदांसोबत सादर झालेल्या या गाण्यांना वेगळीच रंगत चढली होती. सीमा चक्रवर्ती यांनी गायिलेल्या ‘नुरी..नुरी’ या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ दिला. त्यानंतर धनश्री देशपांडे यांनी सादर केलेल्या हिरो चित्रपटातील ‘तू मेरा जानू है’ या गाण्यांवर श्रोते अक्षरश: थिरकले. संतोष बाहे यांनी मुकेशची सदाबहार गाणी सादर केली. पार्श्वगायक गुणवंत डहाणे यांनी मो. रफी यांची बहारदार गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. जुन्या काळातील गाणी त्याचवेळच्या वाद्यवृंदांसोबत सुरेल रितीने वाजवून सचिन गुढे यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. त्याचवेळी सोनू गुढे यांच्या ‘ड्रम सेट’ व तबल्याच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना मोहित केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन संजीव जयस्वाल व संगीता रिठे यांनी केले. कार्यक्रमाला महापौर चरणजीतकौर नंदा, पुरूषोत्तम चौधरी, विलास मराठे, नगरसेवक दिनेश बूब, बबन बेलसरे, बी.एन. राठी, दीपक खंडेलवाल, चंद्रकांत पोपट, सुरेंद्र काळबांडे, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)