अमरावती : बिबट श्वानांची शिकार शोधण्यासाठी जंगल क्षेत्रातून विद्यापीठात येत असल्याची बाब काही नवीन नाही. मात्र, मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने चक्क कॅन्टीनपर्यंत सावज टीपण्यासाठी धाव घेतली. या घटनेवरून विद्यापीठात बिबट्याकडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.विद्यापीठ परिसरात दोन बिबट दोन वर्षांपासून ठिय्या मांडून आहेत. पाणी आणि सावज बिबटांना सहज उपलब्ध होत असल्याने ते विद्यापीठात येत असल्याचे दिसून येते. विद्यापीठात बिबटांचा वावर असल्याने परिंसरात श्वानांची संख्या मात्र नियंत्रणात आहे. परंतु अलीकडे बिबट्याला सावज मिळत नसल्याने ते गर्दीच्या ठिकाणी वावरताना दिसत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता जैवतंत्रज्ञान विभागातील प्रयोगशाळातंत्रज्ञ बोरकर यांना भिंतीलगत बिबट दिसला. भौतिकशास्त्र विभागाच्या लॉनवर रात्री १० वाजता बिबट ऐटीत बसल्याचे एका सुरक्षा रक्षकांनी बघितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावाविद्यापीठात गर्दी असलेल्या भागात बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे शिकार करताना बिबट मनुष्यावरदेखील हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाला यासंदर्भात विद्यापीठाने पत्रव्यवहारदेखील केला आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रशासनाकडून केली जात आहे.जैवतंत्रज्ञान विभागाच्या भिंतीलगत बिबट दिसला. प्राध्यापक बोरकर यांनी दुचाकी उभी केली, तेवढ्यात बिबट तेथून पोबारा झाला. ही बाब सुरक्षा विभागाला कळविण्यात आली. वनविभागाची रेस्क्यू चमू तेथे पोहचली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहे.- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सुरक्षा विभाग अमरावती विद्यापीठ.
बिबट्याची विद्यापीठाच्या कॅन्टीनपर्यंत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:55 AM
सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने चक्क कॅन्टीनपर्यंत सावज टीपण्यासाठी धाव घेतली. या घटनेवरून विद्यापीठात बिबट्याकडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. विद्यापीठ परिसरात दोन बिबट दोन वर्षांपासून ठिय्या मांडून आहेत. पाणी आणि सावज बिबटांना सहज उपलब्ध होत असल्याने ते विद्यापीठात येत असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देभौतिकशास्त्र विभागाच्या लॉनवर ठिय्या : श्वानांच्या शोधात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता