सन्मान : जिल्हा परिषदेमार्र्फ त गौरव ,आरोग्य सभापतीची गैरहजेरी अमरावती : राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण मंगळवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वतीने मंगळवारी करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश हाडोळे,मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, एडीएचओ संतोष माने, जिल्हा क्षयरोग अधिकारी संतोष देवकर, वैद्यकीय अधिकारी रविंद्र बनसोडल दिलीप चऱ्हाटे, राजेश चऱ्हाटे आदीची उपस्थिती होती. यावेळी माता बाल संगोपन कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामिण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचा दरवर्षी रोख पारितोषीक व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. सन २०१३/२०१४ या वर्षात माता बालसंगोपन कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामिण रूग्णालयाचा प्रथम पुरस्कार वरूड ला मिळला आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम पुरस्कार आमनेर केंद्राने पटकाविला आहे.याशिवाय व्दितीय पुरस्कार पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राने तर तृतीय पुरस्कार कोकर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राने मिळविला आहे.आणि उपकेंद्राचा प्रथम पुरस्कार खारतळेगाव केंद्राने पटकाविला आहे. व्दितीय पुरस्कार येरड उपकेंद्राला मिळाला आहे.तर तृतिय पुरस्कार पाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्राप्त झाला आहे. माता बाल संगोपन कार्यक्रमात या आरोग्य केंद्रांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे. (प्रतिनिधी)अध्यक्ष वगळता सर्वाचीच कार्यक्रमाला दांडी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजीत जागतिक आरोग्य दिनाचे कार्यक्राला व डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वगळता एकही पदाधिकारी हजर नव्हता .डिएओचे निमंत्रण नाही.जागतिक आरोग्य दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमाला गैरहजर असलेल्या आरोग्य सभापतीना सतिश हाडोळे यांयाशी संपर्क केला असता त्यांनी .कार्यक्रमा संदर्भात डिएचओच्या प्रतिनिधीनी बोलाविले होते मात्र कार्यक्रमाला यावे याबाबतीत डीएचओनी आपल्याशी चर्चा केली नाही. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने मी मतदार संघात असल्याचे आरोग्य सभापती सतिश हाडोळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले.
माता बालसंगोपन कार्यक्रमात वरूड ग्रामीण रूग्णालयाची बाजी
By admin | Published: April 08, 2015 12:24 AM