शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

‘सायन्स एक्स्प्रेस’ला अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:17 PM

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी ....

ठळक मुद्देजनजागृती : ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केले अवलोकन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी देशभर भ्रमंती करणाºया ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी रविवारी अलोट गर्दी केली. अमरावती रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर सायन्स एक्स्प्रेसने पाणी, पर्यावरण, बदलत्या वातावरणातील जनजागृतीचा संदेश दिला.सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शनीचे उद्घाटन खा. आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. सुनील देशमुख, सायन्स एक्स्प्रेसचे व्यवस्थापक रूबल बोरा, अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी. कोटांगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, शिवसेना महानगरप्रमुख सुनील खराटे, वाणिज्य निरीक्षक व्ही.डी.कुंभारे, प्रकाश मंजलवार, सुनील भालेराव, गणेश उसरे, ए.के.कुटी आदी उपस्थित होते.सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत १ लाख ५६ हजार ५५० किलोमीटरचा प्रवास केला आहे.मागील आठ वर्षांपासून विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी, तरूण पिढीमध्ये जागृती करण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमांतर्गत यंदा पाणी आणि वातावरणातील प्रदूषणावर जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ट्रेनने भुसावळ मध्य रेल्वे विभागात प्रवेश केल्यानंतर अकोला, मुर्तिजापूर त्यानंतर अमरावती असा प्रवास केला आहे. खा.आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने अमरावतीकरांना ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशापुढे पाणी आणि वायू प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश देत ‘सायन्स एक्स्प्रेस’ रविवारी अमरावतीत दाखल झाली. ‘सायन्स एक्स्प्रेस’ रविवारी येणार ही जनजागृती अगोदरच शाळा, महाविद्यालयांमध्ये करण्यात आली होती. त्याअनुषंगाने रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांसह प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती.याट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. रविवारी सायंकाळपर्यंत ५० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या रेल्वेला भेट दिल्याची नोंद येथील नोंदवहीत असल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी.कोटांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सायन्स एक्स्प्रेसला भेट देण्यासाठी सकाळी १० वाजपासून अमरावती रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.जयस्तंभ चौक मार्ग आणि रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. सायन्स एक्स्प्रेसला भेटी देताना गोंधळ होऊ नये, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सी.एच. पटेल, बडनेरा रेल्वे पोलीस निरीक्षक पंकज चक्रे यांच्यासह सुरक्षा व्यवस्था तैनात होती. आरोग्य व्यवस्थेसाठी भुसावळ येथून रेल्वेची विशेष चमू दाखल झाली होती.पाणी प्रदूषणामुळे उद्भवलेल्या धोक्यावर उपाययोजना आणि उपचाराविषयी १३ डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसमधून जनजागृती केली जात आहे. जैवविविधतेविषयीची माहिती, हवाप्रदूषण, जागृती अभियान चालविले जात आहे.- आनंदराव अडसूळखासदार, अमरावती.देशभरात सायन्स एक्स्प्रेसच्या माध्यमातून भ्रमंती करीत असताना तरुण, विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अमरावतीत देखील ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेटी देऊन प्रदर्शनीचा लाभ घेतला आहे.- रुबल बोराव्यवस्थापक, सायन्स एक्स्प्रेस