शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सरपंचाच्या पतीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:16 PM

तळेगाव दशासर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील धोत्रा येथील सरपंचाच्या पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. गावातील युवकाला पूर्वनियोजित कटानुसार वीज खांबावर चढवून त्याला संपविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती

ठळक मुद्देआरोप : वीज खांबावर चढवून युवकाला संपविले

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तळेगाव दशासर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील धोत्रा येथील सरपंचाच्या पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. गावातील युवकाला पूर्वनियोजित कटानुसार वीज खांबावर चढवून त्याला संपविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होतीतक्रारीनुसार, शरद विजय कणसे (३०, रा. धोत्रा) हा सरपंचाचा पती ग्रामपंचायतीशी संबंधित कामे तो करवून घेत होता. ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता पंकज अशोक गोंडाणे (२२) याला शरदने वीज खांबावर बल्ब लावायचा असल्याचे सांगून सोबत घेतले. पंकजने शरदला डीबी बंद केली का, असे विचारले असता, बंद करून डीबीला कुलूप लावल्याचे सांगितले. यानंतर पंकज खांबावर चढला. मात्र, वीजप्रवाह सुरूच असल्याने तो खाली पडून जागीच गतप्राण झाला. माझ्या पुतण्याचा शरदने हेतुपुरस्सर बळी घेतल्याची लेखी तक्रार शुक्रवारी सोमेश्वर बापूराव गोंडाणे (४२) यांनी तळेगाव दशासर पोलिसांना दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.आरोपीला सोडले?लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता शरद कणसेला ठाण्यात आणले आणि दोन तासांनी मुक्त केल्याचा आरोप सोमेश्वर गोंडाणे यांनी केला.तक्रारीवरून आरोपी व मृतासोबत काम करणाऱ्या तिघांचे बयाण नोंदविले. वायरमनचा अहवाल अद्याप आलेला नाही. प्रकरणाची चौकशी सुरूच आहे.- शिवाजी राठोडपोलीस उपनिरीक्षक