लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकºयांसह काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बंदोबस्तासाठी लावलेले बॅरिके टस्सुद्धा कार्यकर्त्यांनी फेकून दिले. पालिसांचा विरोध धुडकावत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दोन्ही प्रवेशव्दारातून जबरीने आत प्रवेश केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना शेतकºयांना फसवी कर्जमाफी नको, तर सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा संपूर्ण कोरा करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन सोपविले.जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व आमदार वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर, जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, यशवंतराव शेरेकर माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, पुष्पा बोंडे यांनी केली. इर्विन चौकातून शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी धडक मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून निघालेला हा मोर्चा दुपारी २ वाजतादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रोखण्यात आला. आमदार व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी बॅरिकेटस तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही मुख्यप्रवेशव्दारातून सभागृहात शिरकाव केला. याठिकाणी राज्य व केंद्रातील भाजप सरकारविरोधात तीव्र घोषणा बाजी करीत जिल्हाकचेरी दणाणून सोडली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासमोर शेतकºयांच्या लोकप्रतिनिधींनी व्यस्था मांडल्यात. ३० जूनपर्यंतचे सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह अदी मागण्या केल्यात.यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष सतीश उईके, सभापती जयंत देशमुख, विक्रम ठाकरे, प्रकाश साबळे, गिरीष कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, अनंत साबळे, भागवत खांदे , श्याम देशमुख, मोहन सिंगवी, प्रवीण घुईखेडकर, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, मोहन पाटील, बिट्टू मंगरोळे, प्रमोद दाळू, राजु कुरेशी, सुरेश आडे, श्रीराम नेहर, किशोर किटुकले, महेंद्र गैलवार, राहुल येवले, किशोर देशमुख, राजाभाऊ जुनघरे, अभिनंदन पेंढारी, वैभव वानखडे, सागर देशमुख, समीर जवंजाळ, संजय मार्डीकर, अभिजित बोके, बापुराव गायकवाड, अनिकेत देशमुख, किशोर चांगोले, अलका देशमुख, संगीता तायडे, पूजा येवले, उषा उताने, दयाराम काळे, श्रीपाल पाल यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची सध्याची आर्थिक अवस्था लक्षात घेता शेतकºयांच्या प्रश्नावर काढलेल्या मोर्चात सहभागी झालेली बैलगाडी अन ग्रामिण भागातून काही शेतमजूर डबळे वाजवित मोर्चात सहभागी झाल्याने सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते.पोलीस अन् कार्यकर्त्यांत बाचाबाचीशेतकºयांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा मुख्य डाक घरासमोरील मार्गावर पोलिसांनी बॅरीकेड्स लावून रोखला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडला. यावेळी काँग्रेस नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.सरसकट कर्जमाफी हवीच, निर्वाणीचा इशाराशेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणी करीत आहे. त्यात पाल्यांचे शिक्षणाकरिता व मुलीच्या विवाहाकरिता शेतकºयांजवळ पैसा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या अनुषंगाने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करून संपूर्ण सातबारा कोरा केल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी शासनाला दिला आहे.
शेतकºयांसाठी काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 10:26 PM
कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकºयांसह काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
ठळक मुद्देसरसकट कर्जमाफीची मागणी : बॅरिकेटस् तोडून जिल्हाकचेरीवर धडक