शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

‘शॉक’ टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम

By admin | Published: April 05, 2016 11:59 PM

उन्हाळा सुरू झाला की, ‘कुलरचा शॉक लागून मृत्यू’ होण्याच्या घटना वारंवार घडतात. कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्याने दरवर्षी अनेकांचे प्राण जातात.

कुलरचा सुयोग्य वापर करा : महावितरणचे आवाहनअमरावती : उन्हाळा सुरू झाला की, ‘कुलरचा शॉक लागून मृत्यू’ होण्याच्या घटना वारंवार घडतात. कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्याने दरवर्षी अनेकांचे प्राण जातात. हे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरण कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी कुलरचा वापर केला जातो. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कुलरचा वापर होत असला तरी कुलर वापरताना काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते. कुलरचा वापर करताना काही पथ्ये पाळल्यास वाढत्या तापमानामध्ये सुरक्षित गारवा अनुभवता येईल. कुलरचे कनेक्शन, वायरिंग व अर्थिंगची योग्य तपासणी इलेक्ट्रीशियनकडून करून घ्यावी, अर्थिंग व्यवस्थित असल्यास विजेची गळती होत नाही. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून त्यानंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करु नये. लहान मुलांना नेहमी कुलरपासून दूर ठेवावे. त्याच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह संचारू नये, यासाठी त्याचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. कुलरमधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू आणि दहा मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. कुलर हलविताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी, कुलरचा पंप अधुनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थलिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावा, अशा सूचना महावितरण कंपनीने केल्या आहेत. योग्य वेळी ही काळजी घेतल्यास कुलरमुळे होणारे अपघात बऱ्याच प्रमाणात घटू शकतात व सुरक्षित गारवा अनुभवता येऊ शकतो. या आहेत उपाययोजनाकुलरसाठी नेहमी ‘थ्री-पिन’चा वापर करावा. त्यात पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करुन प्लग काढून ठेवावा. म्हणजे कुलरचा विजेशी संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून जमिनीवर परसरणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. त्यानंतर ‘प्लग पिन’ लाऊन स्वीच सुरू करावा. कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करु नका.