शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

१०० अन् ५०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री व्हेंडरमार्फतच; मुद्रांक बंद होण्याची बातमी खोटी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 9, 2024 17:59 IST

नोंदणी महानिरीक्षकांचे पत्र : समाजमाध्यमांवरील स्टॅम्प बंदच्या अफवेला पूर्णविराम

अमरावती : समाजमाध्यमांवर अलीकडे १०० रुपयांचे मुद्रांक आता बंद करण्यात येणार याबाबतच्या पोष्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत; मात्र अशा प्रकारे कोणताही शासन निर्णय झालेला नाही व या सर्व मुद्रांकाची विक्री मुद्रांक विक्रेत्यांद्वारा होत असल्याचे पत्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक निरीक्षक हिरालाल सोनवणेे यांनी जारी केले आहे.

आता वैयक्तिक स्वरुपाची सर्व शपथपत्र ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावी लागणार, शासनाने १०० रुपयांचे मुद्रांक बंद केले असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांद्वारा भन्नाट व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध मुद्रांक विक्रेता संघटना, लोकप्रतिनिधी, अखिल महाराष्ट्र मुद्रांक समिती पुणे व इतर मुद्रांक विक्रेता महासंघाद्वारा शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत.

इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांनी शासनाची सेवा करून महसुलात भर घातली आहे. या विक्रेत्यांद्वारा जनतेला सहजरित्या मुद्रांक उपलब्ध होत आहे. मुद्रांकाची छपाई बंद केल्यास हे सर्व विक्रेते बेरोजगार होतील व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे नमूद करून मुद्रांक विक्रीची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याची मागणी, या संघटनांद्वारा करण्यात आली होती व याकरिता काही जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांनीच याबाबतचा खुलासा केल्याने कथित चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

काय म्हणाले नोंदणी महानिरीक्षक ?१०० व ५०० रुपयांचा मुद्रांक सद्य:स्थितीत व्यवहारात सुरू आहे. शिवाय विक्रीही मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच सुरळीत सुरू आहे. त्यामुळे शासनस्तरावर १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याबाबत कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. असे नोंदणी महानिरीक्षकांच्या पत्रात नमूद आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर रंगलेल्या चर्चेला आता विराम मिळाला आहे.

"समाजमाध्यमांवर याबाबतच्या व्हायरल होत असलेल्या पोष्ट निरर्थक आहेत. १०० व ५०० रुपयांचा मुद्रांक बंद झालेला नाही. याबाबत कोणताही शासनादेश नाही. या मुद्रांकाची नियमित विक्री मुद्रांक विक्रेत्यांद्वारा सुरू आहे."- अनिल औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी.

टॅग्स :AmravatiअमरावतीFake Newsफेक न्यूज