संदीप मानकर
अमरावती : यंदा दसरा, दिवाळी, भाऊबीजचे मुहूर्त काढून नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्याचा बेत आखला. त्यानुसार यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात सर्वाधिक ५७५३ दुचाकींची खरेदी अमरावतीकरांनी केली. यंदा कोरोनाच्या संसर्गातही ९५२ कारची विक्री झाली. यामध्ये महागड्या कारचाही समावेश आहे.
दुचाकी व कार यासंदर्भात आरटीओकडे नोंदणी झाली.
२०१९ मध्ये गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात ७२३९ दुचाकींची, तर ९१३ कारची विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कारची विक्री वधारली, तर दुचाकी विक्रीमध्ये घट झाल्याचे दुचाकी व कार डीलरने सांगितले.
ऑक्टोबर २०२० मध्ये २३८१ दुचाकींची व ५६८ कारची विक्री झाली. यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती. १ ते २० नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार ३३७२ दुचाकी आणि ३८४ कारची विक्री झाली. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये २१११ दुचाकी, तर ३६३ कारची विक्री, तर नोव्हेंबरमध्ये ५१२८ दुचाकींची तसेच ५५० कारचीसुद्धा विक्री झाली. यंदा दिवाळीचे मुहूर्त काढून नागरिकांनी घर व फ्लॅटसुद्धा खरेदी केली आहे.
दुचाकींची विक्री - ५७५३
चारचाकींची विक्री - ९५२
२०१९ मध्ये दुचाकींची विक्री -७२३९
२०१९ मध्ये चारचाकींची विक्री -९१३
२०२० मध्ये दुचाकी - ५७५३
२०२० चारचाकी - ९५२
बॉक्स :
महागड्या चारचाकी वाहनांची विक्री
यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी १५ लाख २० लाखांपासून, तर ४० लाखांपर्यंत महागड्या चारचाकी कारलासुद्धा पसंती दर्शविली आहे. काही वाहने तर नागपूरहून खरेदी करण्यात आली. मात्र, त्यांची पासिंग व नोंदणी अमरावती आरटीओत करण्यात आल्याची माहिती एआरटीओ प्रशांत देशमुख यांनी दिली.
बॉक्स:
घर खरेदीत झाली ५० टक्के वाढ
अमरावती शहरात फ्लॅट व बंगलो तयार करून विक्री करणारे सरासरी ७० बिल्डर आहेत. यंदा फ्लॅट व घर विक्रीमध्ये चांगली उलाढाल झाली. अंदाजे शहरात सर्वांची ५० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती बिल्डर सचिन वानखडे यांनी दिली. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तेजी नसली तरी दिवाळीत अपेक्षित उलाढाल झाल्याचे ते म्हणाले.
कोट
संपूर्ण राज्यात व्यवसायवृद्धीच्या अनुषंगाने महागडी कार खरेदी केली. कोरोनामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. हा दृष्टिकोनदेखील वाहन खरेदीमागे होता.
- प्रशांत मोंढे, अमरावती
कोट
बसमधील गर्दी कोरोनाचा धोका वाढवित आहे. त्यामानाने दुचाकीवरून प्रवास सुरक्षित वाटतो. म्हणून दचाकी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली.
मुकेश सहारे, अमरावती
कोट
कार शोरूम संचालकांचा कोट आहे.