लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून या भागातील शेतकºयांचा संत्रा थेट बंगळुरू येथील मॉलमध्ये पाठविला जातो. त्या माध्यमातून ७ ते ८ हजार रुपये प्रतिटन अतिरिक्त पदरी पडले.शेतकºयांच्या शेतमालाला थेट विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ खरेदीदार व विक्रेता चर्चासत्र आयोजित केले होते. त्या सभेत पंकज दंडाळे, गणेश कोठे, धनंजय लोडम व विविध क्षेत्रात काम करणाºया कंपन्यांनी सहभाग घेतला. चर्चाच्या अनुषंगाने फ्यूचर रिटेल कंपनीसोबत श्रमजिवी संत्रा उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगर्दे व रमेश जिचकारा यांनी सामजंस करार करून ६५ मिमी आकाराच्या संत्राफळाचा ८ मे. टन पुरवठा बिग बाजार फ्यूचर रिटेल बंगळुरू येथे रुपये ५२ प्रति किलो पोहोच खर्च वजा जाऊन रुपये ७ ते ८ हजार प्रति टनप्रमाणे अधिक रक्कम शेतकºयांना प्राप्त झाली.प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादक मागे पडले आहेत. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेत संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उत्पादकांना याचा थेट लाभ मिळेल.- रमेश जिचकार,श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनी
वरुडच्या संत्र्यांची विक्री बंगळुरूच्या मॉलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 9:55 PM
थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा पुढाकार : उत्पादक ते थेट ग्राहक ही उपलब्धी