शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आत्मध्यानातून मोक्षप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:02 PM

जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.

ठळक मुद्देपरमानंद महाराजांचे प्रबोधन : आत्मा मालीक ध्यान योग मिशन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालीक ध्यानपिठाच्यावतीने शहरात प्रथमच रविवारी सायंकाळी बडनेरा रोड स्थित नरेशबाबू लॉन येथे आत्मा मालिक सत्संग सोहळा पार पडला.अनादी काळापासून आत्मसत्व चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत असेच चालत राहील, कारण आत्मा अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा स्थित होता, म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे. आत्म्यावर प्रेम केले पाहिजे, तसेच क्षणभर केलेले आत्मचिंतन कितीतरी श्रेष्ठ आहे. आत्मध्यानातून मोक्ष प्राप्ती होऊ शकते, हाच उद्देश आत्मा मालिक ध्यानपिठाचा असल्याचे ते म्हणाले.सबका मालिक आत्मा, या विषयावर सत्संगाद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन उपस्थित संतांनी केले. अमरावतीमधील सत्संग न भुतो भविष्यती, असा असल्याचे ते म्हणाले. अंबानगरी संताची नगरी आहे, या संताच्या नगरीत आत्मध्यान सत्संगाचा योग ईश्वरीय शक्तीची अनुभुतीच आहे. आज प्रत्येक जिवाला सुख, आनंद हवा, मी कोण आहे, हे कळावे, यासाठी आत्मध्यान करणे आवश्यक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आनंदाचा शोध घेतो, मात्र, खरा आनंद मिळविण्यासाठी आत्मध्यान प्राप्त करणे आवश्यक आहे. सत्संगाच्या यशस्वीतेसाठी आर.बी.अटल, संजय हरवानी, नरेंद्र भाराणी, राजेश डागा, संतोष महात्मे, सुरेश रतावा, विक्रम झंवर, विनायक ठाकरे, मेघशाम करडे, देवदत्त शर्मा, विनोद डागा, गोपाल धुत, रोहित राठी, सुधीर वाकोडे, पवन भुतडा, शुभम शेगोकार, सुभाष पावडे, अनिल सावरकर यांनी परिश्रम घेतले. या सत्संग सोहळ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे, नवनीत राणा, हनुमंत भोगळे, विलास इंगोले यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.आत्मध्यान सत्संगातील भजनामुळे मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली होती. भजन सेवा मंडळाचे जगदिश चव्हाण यांनी भजन गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.बालब्रम्हचारी वृंदाचा मंत्रोपचारआत्मध्यान करताना आत्म्याची पूजा मंत्रोपचाराने करण्यात आली. बाल ब्रम्हचारी वृंदांनी वेद मंत्र उच्चारून सत्संग सोहळ्याला सुरुवात केली. बेलोरा येथील वैभव जोशी यांच्या नेत्तृत्वात बाल देवतांनी मंत्रपुष्पांजली अर्पण केली.विवेकानंद महाराजांचा नामस्मरणाचा मंत्रसंत महापुरुषांनी आपल्या वाणीतून सर्वांना धार्मिकतेचे ज्ञान दिले. मात्र, भक्तांनी ते ऐकण्याशिवाय काही केले नाही. संत महात्म्यांनी दिलेल्या ज्ञानाची कृती केली नाही, त्यामुळे वैराग्य प्राप्त झाले नाही. संतांनी प्रबोधन केले, मात्र, तरीही समाज परिवर्तन होत नाही, कारण संतांनी सांगितलेले केवळ ऐकत गेलो,जोपर्यंत आपण आत्म्याला जाणत नाही, तोपर्यंत परमात्मा मिळत नाही, त्यामुळे सदगुरुच्या शरण जा, नामस्मरण करा, असा संदेश विवेकानंद महाराज यांनी दिला.सीपी दत्तात्रय मंडलिक माऊलीच्या सानिध्यातपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आत्मा मालीक सत्संग सोहळा आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले. माऊलीच्या सानिध्यात त्यांनी आत्मध्यानाची उपासना केल्याचे परमानंद महाराज यांनी मंचावर आवर्जून सांगितले. मंडलिक यांच्या पुढाकारानेच हा भव्यदिव्य असा सत्संग सोहळा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.