'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:32 PM2023-07-31T12:32:55+5:302023-07-31T12:34:14+5:30

राष्ट्रपित्याला जो शिव्या देतोय तो हरामखोर आहे. माझ्या जिवाला काही बरे वाईट झाले तर गृह मंत्री, पोलीस, धारकरी आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे जबाबदार राहतील असा इशारा ठाकुर यांनी दिला आहे. 

'Sambhaji Bhide talk for bJp Anil Bonde to get a ministry'; Yashomati Thakur's get threat like Dabholkar | 'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

googlenewsNext

आम्ही धारकरी आहोत, आम्ही कशी गत करतो, कधी धार आहे आम्हाला. दाभोळकरांना जसे टराटरा फाडून जन्नतमध्ये टाकले तरी तुमची गत करू. हा हरामखोर कोण आहे ते तुम्ही स्पष्ट करा अशी धमकी आल्याचे यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. ट्विटरवर ही धमकी आली आहे. यावरून ठाकुर यांनी भाजपा नेते, अनिल बोंडे यांच्यावर टीका केली आहे. 

राष्ट्रपित्याला जो शिव्या देतोय तो हरामखोर आहे. माझ्या जिवाला काही बरे वाईट झाले तर गृह मंत्री, पोलीस, धारकरी आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे जबाबदार राहतील असा इशारा ठाकुर यांनी दिला आहे. 

एकीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणतायत की आमचे काही देणेघेणे नाहीय. दुसरीकडे त्यांचाच पिलाट्टू, ज्याला गेल्या वर्षी त्यांनी राज्यसभेवर पाठविलेले. मागच्यावेळी त्याने दंगल घडविलेली, म्हणून त्याला राज्यसभा मिळाली. तो आता मिनिस्ट्रीच्या मागे लागलेला आहे. त्याला मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड आहे. म्हणून ते त्यात सहभागी झालेत. म्हणजे भाजपा त्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. तो मनोहर कुलकर्णी या तोंडातील शब्द ते भाजपाच्या तोंडातील शब्द आहेत, असे म्हणालायला काही हरकत नाही, असा आरोप ठाकुर यांनी केला. 

आम्हाला मारून टाकयचं असेल तर मारून टाका, पण आम्ही याचा पर्दाफाश केल्या शिवाय राहणार नाही. या मागे जे सत्ताधारी आहेत, त्यांचा हात आहे. माझ्या जिवाला जर काही झालं तर त्याला जबाबदार होम डिपार्टमेंट राहिल, असा इशारा ठाकुर यांनी दिला. 

Web Title: 'Sambhaji Bhide talk for bJp Anil Bonde to get a ministry'; Yashomati Thakur's get threat like Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.