अमरावती: जिल्हा परिषदेच्या शाळांना सन २०२०-२१ या वर्षासाठी चार टक्के सादील अंतर्गत १ कोटी ३० लाख ४४ हजार एवढी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.याबाबतचा आदेश १२ फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जारी केला आहे.सदरचा निधी जिल्हा परिषदेच्या १५६२ शाळांना मिळणार आहे.शिक्षण विभागाने सादील करीता दिलेली रक्कम ही ठरवून दिलेल्याच उपाययोजनावर खर्च करावी लागणार आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने ४ टक्याप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या रक्कमेतून शाळा इमारत,स्वच्छतागृहांची देखभाल, व दुरूस्ती,वैयक्तीक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री,इंटरनेट,जोडणी व देयके,विविध डिजिटल व संगणक साहीत्य व त्यासोबतची उपकरणे यांनी देखभाल व दुरूस्ती,पिण्याच्या पाण्याची देखभाल व दुरुस्ती, स्टेशनरी व विविध प्रकारचे रजिस्टर्स याची खरेदी अग्निप्रतिबंधक यंत्राची पुनर्भरणी,प्रथमोपचार पेटी,वीजबिल आदी बाबीवर प्रती शाळा व प्रति महिना या मर्यादेत इतर निधीतून वीजबिल भरले नसल्यास याकरीता खर्च करता येणार आहे. सदर साहील निधी हा संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने शाळांना वितरीत करावा अशा सूचना शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. निधी खर्चाबाबत मुख्याध्यापक यांनी नियमानुसार ३१ मार्च २०२१पर्यत खर्च करून सदर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत सादर करावे याबाबत अनियमितता होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश बीईओंना दिले आहेत.
कोट
मागील काही महिन्यापासून सादील अनुदान शाळांना उपलब्ध झाले नव्हते परिणामी आता शालेय खर्चासाठी सादीलचे अनुदान तालुनिहाय शाळांना मंजूर केले.त्याचे वितरणाचे आदेश बीईओंना दिले आहेत.
ई.झेड खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक