लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक संजय गांधीनगर २ मध्ये सन १९८२ पासून नागरिक राहत आहेत. त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही मिळत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब नागरिकांना याच जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्यावे, अशी सूचना आ. रवि राणा यांनी सोमवारी आयोजित आढावा बैठकीत दिली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा उपस्थित होते. संजय गांधीनगरातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व वनविभागाने सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याची मागणी आ.राणा यांनी केली. या प्रस्तावात नागरिकांना जागेची मूळ मालकी देण्यातबाबत शासनपातळीवर कार्यवाही सुरू असून वनविभागाने संजय गांधीनगरवासीयांना बजावलेल्या नोटिसा चुकीच्या असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. संजय गांधीनगरातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर केला जाणारा प्रस्ताव आ. राणा यांनी मागविला. या प्रस्तावानुसार शासनदरबारी जनतेला न्याय मिळून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ.राणा म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक मंगेश मनोहरे व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
संजय गांधीनगरवासीयांना कायमस्वरूपी पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:38 PM
स्थानिक संजय गांधीनगर २ मध्ये सन १९८२ पासून नागरिक राहत आहेत. त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही मिळत आहे.
ठळक मुद्देप्रशासन सकारात्मक : रवी राणा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक