लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून संजय बाविस्कर यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात मावळते पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निरोप देऊन नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची बदली पुणे येथील सीआयडीचे उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली. निरोप-स्वागत समारंभाला पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, उपमहानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, नव्या पोलीस उपायुक्त निवा जैन, सहायक पोलीस आयुक्त गोर्डे, डाखोरे व देसाई उपस्थित होते. मडंलिक यांनी अमरावती शहराची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काळजीपूर्वक हाताळली. त्यांच्यासोबत काम करण्याचे अनुभव किशोर शेंडे, वर्षा हकले, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, आसाराम चोरमले, नीलिमा आरज, अर्जुन ठोसरे, एपीआय कांचन पांडे यांनी मांडले.मंडलिक यांनी बारीकसारीक बाबींवर लक्ष घालून कामांमध्ये योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात आम्हाला प्रेरणा मिळाली, अशा विविध बाबी कर्मचाºयांनी समारंभात व्यक्त केल्या. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या मनोगताने दत्तात्रय मंडलिक भारावून गेले होते.याप्रसंगी माध्यमांशी बोलताना नवनियुक्त पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर म्हणाले, शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे सर्वोपरी प्रयत्न करू. मडंलिक यांच्या कार्यकाळातील योजना अमलात आणल्या जाईल. लोकसहभागातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवू. पोलिसांच्या समस्या प्राधान्याने सोडवू. सुस्त कारभार सुधारण्यासाठी मंडलिक यांनी प्रयत्न केले. तेच प्रयत्न पुढेही सुरू राहील.असा आहे नवीन सीपींचा कार्यकाळशहर पोलीस आयुक्तालयाचे नवे आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना १९९२ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती मिळाली. त्यांनी नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून धुरा सांभाळली. तेथील कार्यकाळ वाढवून घेतला होता. त्यानंतर त्यांनी अमरावती जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पद सांभाळले. त्यावेळी अमरावती जिल्ह्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर मुंबई एटीएसचे कामकाज त्यांनी सांभाळले. २००८ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटाचा तपास त्यांनी केला. त्या प्रकरणात आरोपी शिक्षाप्राप्त आहेत. त्यानंतर औरंगाबाद व नागपूर येथे एसीबीत सेवा दिली. त्यानंतर पाच वर्षे मुंबईत पोलीस उपायुक्तपद भूषविले. त्यानंतर सिंधुदुर्ग व बुलडाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळली. तेथून त्यांची बदली पुणे येथे पोलीस उपायुक्तपदी झाली. तेथून पदोन्नती होऊन ते आता अमरावतीत पोलीस आयुक्तपदी रुजू झाले.
संजयकुमार बाविस्कर यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:19 PM
शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून संजय बाविस्कर यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात मावळते पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निरोप देऊन नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देआयुक्तालयात स्वागत समारंभ : मावळत्या सीपींना निरोप