रखडलेल्या पेरणीची पुन्हा लगबग,भातकुली तालुक्यात ९० टक्के पेरणी आटोपली
टाकरखेडा संभू : दुबार पेरणीच्या सावटात शेतकरी असताना भातकुली तालुक्यात १५ दिवसांच्या दडीनंतर बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रखडलेल्या पेरणीलादेखील आता जोरात सुरुवात झाली असून भातकुली तालुक्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी आटोपली आहे.
यावर्षी आधीच मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी चांगला सुखावला आणि जुलैपासून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. भातकुली तालुक्यात ७० टक्के पेरणी आटोपली. मात्र, पावसाने अचानक दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु, शुक्रवारपासून पावसाने सुरुवात केल्याने तालुक्यातील ७० टक्के पिकांना नवसंजीवनी मिळाली. याशिवाय रखडलेल्या पेरणीलादेखील जोरात सुरुवात झाली आहे. रविवारपासून शेतात पेरणीची लगबग तालुक्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत ९० टक्के पेरणी आटोपली आहे. यामध्ये कपाशीची सर्वाधिक १० हजार २१५ हेक्टर म्हणजेच १२९ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची ८४, तुरीची ८१ टक्के, उडीद ८८ टक्के, मूग ३२ टक्के, मका ४० टक्के पेरणी आटोपली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.
130721\img-20210713-wa0047.jpg
टाकरखेडा संभु परिसरात तूर व सोयाबीन ची पेरणी करताना