पोटनिवडणूक : कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सारिका अनिल पिंपळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार लता गौर यांचा १०७० मतांनी पराभव केला. अन्य उमेदवार ३५० मतांचा आकडा देखील गाठू शकले नाहीत. पोटनिवडणुकीसाठी २४ मे रोजी मतदान घेण्यात आले होते. नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. याविजयामुळे शिवसेनेचे नगर परिषदेमधील संख्याबळ ४ झाले आहे. निवडणुकीत ४२५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेच्या सारिका पिंपळे व लता गौर यांच्यात थेट लढत झाली. सारिका पिंपळे यांना २३४७ मते मिळाली. अपक्ष लता रामभरोसे गौर यांचा त्यांनी थेट पराभव केला. पाच उमेदवार रिंगणात होते. २२ मतदारांनी नोटाला पसंती दिली.निवडणुकीपूर्वी दोन गटांत राडामतदानाच्या आदल्या दिवशी दोन गटांत राडा झाल्याने नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या पतीसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. तणावसदृश स्थिती लक्षात घेता निवडणुकीदरम्यान पोलिसांचा परिसरात तगडा बंदोबस्त होता. विलायतपुरा प्रभागातील जनसामान्यांनी दुसऱ्यांदा दिलेला कौल हा विकासाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल. शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे - सुनीता नरेंद्र फिसके नगराध्यक्ष अचलपूर प्रभागातील विकासासह रखडलेली सर्व कामे करण्यावर भर राहणार आहे शासनाच्या योजनांचा गोरगरीब आणि योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करेन. - सारिका पिंपळे विजयी उमेदवार
अचलपुरात सारिका पिंपळे विजयी
By admin | Published: May 27, 2017 12:03 AM