येवदा : ग्रामपंचायत सासन बु. येथील दोन अनुसूचित जातीच्या महिलांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत सचिवाने जागेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी न्याय मिळवण्याकरिता त्यांनी १७ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास सुरु केले होते. त्यांना घरकुल मंजूर असताना २० वर्षांपासून जागेअभावी ते घरकुलापासून वंचित राहिले.
शेषकन्या रामदास वानखडे व लक्ष्मी रामदास धांडे या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत सचिवाने लाभापासून वंचित ठेवल्याने त्यांनी ग्रामपंचायतसमोर सभामंडप टाकून आमरण उपोषणास सुरुवात केली. आमरण उपोषण सुरू असताना दर्यापूर येथील खंडविकास अधिकारी रायबोले यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली व तातडीने उपोषण कार्यकर्त्यांना लेखी कायमस्वरूपी जागा देऊन उपोषणाची निंबू सरबत देऊन कार्यकर्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी खंड विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायतचे अधिकारी तसेच ग्रामसेवक नागे, येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमूल बच्छाव, कर्मचारी व अंकुश वाकपांजर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर आठवले व माजी सरपंच तसेच इत्यादी उपस्थित होते.