लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच वर्षांत अमरावती मतदारसंघात भरपूर विकासकामे झाल्याचे समाधान आहे, असे महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांनी सांगितले. गुरुवारी प्रचारादरम्यान वडाळी परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला अन् त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळी नगरसेविका विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत संपूर्ण वडाळी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जागोजागी आमदार देशमुख यांचे कुमकुमतिलक लावत हार घालून स्वागत व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.या पदयात्रेत वडाळी परिसरातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. मतदारांशी संवाद साधत असताना देशमुख यांनी केलेल्या विकासकामांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच देशमुख यांनी वडाळी भागातील प्रबुद्धनगरातील बुद्ध विहारात जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. त्यानंतर ही पदयात्रा गवळीपुरा, इंद्रशेष बाबा संस्थान देवस्थान, अण्णाभाऊ साठे चौक, भारतनगर आदी ठिकाणी पोहोचली. या पदयात्रेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, माजी महापौर अशोक डोंगरे महापौर संजय नरवणे, मनपा गटनेते सुनील काळे, मिलिंद बांबल, चंदू बोमरे, सुनील जावरे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रमोद राऊत, मंगेश कोंडे यांच्या महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावती मतदारसंघात विकासकामे केल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 6:00 AM
वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळी नगरसेविका विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत संपूर्ण वडाळी परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
ठळक मुद्देसुनील देशमुख : वडाळी भागात नागरिकांशी संवाद