अमरावती : अखिल विदर्भ व-हाडी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने ९ व १० नोव्हेंबर रोजी होणाºया विदर्भ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सतीश तराळ यांची एकमताने निवड करण्यात आली. सतीश तराळ हे ४० वर्षांपासून सातत्याने कथा कविता समीक्षा आदी लिखाण करीत असून, त्यांची १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य पुरस्कारांसह विविध महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या साहित्याचा विद्यापीठीय व शालेय मराठीच्या अभ्यासक्रमातही समावेश झालेला आहे. डॉ. सतीश तराळ हे अभ्यासू वक्ते म्हणून लौकिक असून महाराष्ट्रातील बृहन्महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्याख्यानमालामधून ते व्यक्त झालेले आहेत. कथा सांगणारे कथाकार म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध प्रवाही साहित्य संमेलनांतील त्यांचा सहभाग विक्रमी आहे.व-हाडी बोलीच्या प्रचार - प्रसारातील त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. या निवडीबद्दल अखिल विदर्भ वºहाड साहित्य प्रतिष्ठान अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष का.रा.चव्हाण यांनी मंच परिवाराकडून शुभेच्छा कळविल्या आहेत.
सतीश तराळ यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 8:35 PM