शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

विलोभनीय कडी असणारा ‘शनी’ ८ ला पृथ्वीच्या जवळ

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 02, 2024 4:46 PM

खगोलीय घटना : प्रतियूतीमध्ये पृथ्वी-शनी यांच्यातील अंतर कमी

गजानन मोहोड

अमरावती : सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या अगदी जवळ राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या दरम्यान पृथ्वी-शनी यांच्यातील सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर रिंग चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.

पृथ्वी ज्या वेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही. शनीचा अभ्यास करणारे महिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ हे आहे. व्हायेजर या मानवरहित यानानेसुद्धा शनीचे जवळून छायाचित्र घेतले आहे. ८ सप्टेंबरला सूर्य मावळल्यानंतर लगेच हा ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पश्चिमेला मावळेल, हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल.हा ग्रह काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने सहज ओळखता येईल. परंतु या ग्रहाची प्रसिद्ध रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. याआधी २७ ऑगस्ट २०२३ रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, अशी मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

शनीला ८२ चंद्र, सर्वात मोठा टायटनशनीला एकूण ८२ चंद्र असून सर्वात मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी आहे. तापमान शून्याखाली १८० अंश सेंटिग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनीची रिंग ही बर्फाची आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट असल्याचे गिरुळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती