शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

‘मला वाचवा’ तरुणीचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:52 AM

शुक्रवारी भर दुपारी १२.१५ वाजताची वेळ. नवसारी पॉवर हाऊससमोर वाहनांची वर्दळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणीला दोन तरुण चारचाकी वाहनांत कोंबत होते. ती ‘मला वाचवा’ अशी विनवणी करीत होती. परिसरातील नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

ठळक मुद्देअपहरणाने हादरला नवसारी परिसर : प्रियकराचा प्रताप; नागरिक मदतीला धावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुक्रवारी भर दुपारी १२.१५ वाजताची वेळ. नवसारी पॉवर हाऊससमोर वाहनांची वर्दळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणीला दोन तरुण चारचाकी वाहनांत कोंबत होते. ती ‘मला वाचवा’ अशी विनवणी करीत होती. परिसरातील नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच ते तरुण वाहनासह पसार झाले. गाडगेनगर पोलिसांंनी तात्काळ पाठलाग करून दोन तासांत अपहृतासह दोन तरुणांना पकडण्यात यश मिळविले. प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने प्रियकराने हा प्रताप केल्याचे या घटनेत पुढे आले आहे.मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी अपहरणात सहकार्य करणाऱ्या एका तरुणीला पकडून ठेवले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाच्या स्वाधीन केले. तिच्या चौकशीतून पोलिसांनाअपहरणकर्त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. अहरणकर्त्यांनी त्या मुलीला मोबाइलवर चुकीचा मार्ग सांगितला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली. त्यामुळे त्यांचे मोबाइल लोकेशन घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली.येसुर्णा ते असदपूर मार्गावर गाठलेअमरावती : पोलिसांनी मार्ग बदलवून लोकेशननुसार अपहरणकर्त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी अपहरणकर्ता त्या मुलीला घेऊन दुचाकीवर होता. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना येसुर्णा ते असदपूर मार्गावर गाठले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.मक्रमपुरातून घेतली दुचाकीअपहरणकर्ता गोपाल गाडेने एमएच ३० एल ९९६२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने प्रेयसीचे अपहरण करून तिला मक्रमपूर येथील जावयाच्या गावी नेले. गोपालचा मित्र पवन नंदू रायबोले (२४, रा. आष्टी) याचे हे चारचाकी वाहन आहे. गुरुवारी त्याने ही चारचाकी घेतली. ती रस्त्यावरच ठेवून गोपाल जावयाच्या घरी गेला आणि एमएच ३० बीई ४५७८ क्रमांकाची दुचाकी घेऊन आला. त्यानंतर दुचाकीवर प्रेयसीला बसवून तो अकोलाकडे जाण्यासाठी निघाला.घटनेनंतर लगेच नाकाबंदीनवसारीतून तरुणीचे अपहरण झाल्याची माहिती वायरलेसद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना कळविण् यात आली होती. त्यानुसार वलगाव, नागपुरी गेट, नांदगाव पेठ व ग्रामीण हद्दीतील आसेगाव व परतवाडा पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी वाहन बदलविल्याने ते हाती लागले नव्हते.दोन मुलींची चौकशीअपहरणानंतर नागरिकांनी एका तरुणीला पकडून ठेवले होते. याशिवाय अपहरणकर्त्यांसोबत आणखी एक तरुणी असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दोन तरुणींचा अपहरणात सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची पोलीस चौकशी करतील.तरुणांविरुद्ध गुन्हापीडिताच्या वडिलांनी गाडगेनगर पोलिसांत सायंकाळी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल रमेश गाडे (२५) व शुभम नंदकिशोर झापर्डे (२१, रा. शिवर, अकोला) विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोधमुलगी व तिचे अपहरण करणारा गोपाल गाडे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेम आहे. गोपाल अनेकदा प्रेयसीला घेऊन अकोला येथे गेला. दोघांनीही मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रेमप्रकरणाला मुलीचे कुटुंबीय विरोध करीत होते. त्यामुळे गोपालने प्रेयसीच्या अपहरणाची योजना आखली. ही बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.दोन तासांत आरोपी ताब्यातनवसारीतून युवतीचे अपहरण झाल्याचे कळताच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सामटकर, पोलीस हवालदार प्रशांत दीपक वानखडे, प्रशांत बोंडे, प्रशांत वानखडे, दिगांबर चव्हाण यांनी तत्काळ नवसारी गाठले. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. या पाठलागात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी वेळोवेळी ठाणेदारांना मार्गदर्शन केले. त्यामुळे दोन तासांतच या घटनेचा उलगडा झाला.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस