शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

अभिलेख जतन; दीड कोटींचा खर्च

By admin | Published: April 22, 2017 12:21 AM

जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखाकार कक्षात १८ व्या शतकापासून संग्रही असलेले २७ लाख ३२ हजार ७०० कागदपत्रे आहे.

१८ व्या शतकातील रेकॉर्ड : प्रस्तावाला शासनाचा ठेंगा अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखाकार कक्षात १८ व्या शतकापासून संग्रही असलेले २७ लाख ३२ हजार ७०० कागदपत्रे आहे. महत्वपूर्ण असलेले हे अभिलेख कायमस्वरुपी जतन करण्यासाठी अंदाजपत्रकानुसार एक कोटी ३१ लाख ३२८ रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या एनआयसी विभागाला सादर करण्यात आला. मात्र अद्याप या प्रस्तावाला हिरवी झेंडी नसल्यामुळे या रेकॉर्डची दुर्दशा झालेली आहे. या अभिलेखाकार विभागात १८ व्या शतकातील पोलीस स्टेशन डायऱ्या, हक नोंदणी नोंदवह्या, फेरफार नोंदवह्या, रेफ्युजी रजिष्टर, सेटलमेंट प्रकरणे असा एकूण दोन हजार ९९९ अभिलेख व सात लाख ६८ हजार ९०० पानांचे रेकॉर्ड तर सर्व तालुक्याचे भूसंपादन प्रकरणे, जमीन वाटप, अकृषक प्रकरणे, प्लॉट, तगाई, कुळ, सिलींग, ई-क्लास आदी सहा हजार ५४६ अभिलेख असे एकूण १९ लाख ६३ हजार ८०० पानांचे रेकॉर्ड जतन आहे. मात्र हे सर्व स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ जुलै २०१२ च्या परिपत्रकान्वये जिल्हा प्रशासनाने सर्व कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नसल्याने जीर्णावस्थेतील रेकॉर्डची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. अगदी स्पर्श करताच तुकडा पडते अशी दुर्दशा झाली आहे. नागरिकांच्या जीवनासी असणारे हे महत्वाचे रेकॉर्ड मागणीसाठी अर्ज केल्यास याची नक्कल मिळत नाही. त्यामुळे अनेक महत्वाची कामे रखडल्याची कित्येक उदाहरणे आहेत. राज्य शासनाचे ई-अभिलेख धोरणाची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख्यांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन झालेले नाही. अधिकार अभिलेखांच्या संगणकीकरणाचा कार्यक्रम जमाबंदी आयुक्तांकडून सर्व तहसील कार्यालयात राबविण्यात आला. मात्र यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख शाखेचा त्यात समावेश नसल्याने सुमारे १५० ते २०० वर्षाचे महत्वपूर्ण रेकॉर्ड नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) स्कॅनिंग, डिजिटायझेशनसाठी येणारा खर्च लॅमिनेशनसाठी येणारा खर्च - प्रति पेज ८.८२ रुपये दराप्रमाणे सात लाख ६८ हजार ९०० कागदपत्रांसाठी ६७ लाख ८१ हजार ६९८ रुपये. स्कॅनिंगसाठी येणारा खर्च - प्रति पेज १.८० रुपये दराप्रमाणे सात लाख ६८ हजार ९०० कागदपत्रांसाठी १३ लाख ८४ हजार २० रुपये. स्कॅनिंग (ए ४) साईझसाठी खर्च - प्रति पेज ०.९५ रुपये दराप्रमाणे १९ लाख ६८ हजार ८०० कागदपत्रांसाठी १८ लाख ६५ हजार ६१० रुपये. या तिन्ही प्रकारात एकत्रित येणारा खर्च १ कोटी ३१ लाख ३२८ रुपये. तीन फेजमध्ये हा कार्यक्रम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७० लाख दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आलेले आहेत. येथील अभिलेखाकार विभागातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - के.पी. परदेशी, प्र. जिल्हाधिकारी